Textile  Agrowon
ॲग्रोमनी

भारतीय वस्त्रोद्योग निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर जाणार !

कापूस उत्पादन वाढवण्यासाठी जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान, कच्चा माल, अत्याधुनिक रसायने यांच्या वापरासाठी आपण सज्ज असायला हवे. तरच आपले उत्पादन, उत्पादकता वाढेल अन आपल्या उत्पादनांना जगात मागणी वाढेल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले आहे.

Team Agrowon

वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढीची क्षमता लक्षात घेता भारताची वस्त्रोद्योग निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा संकल्प केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियात वस्त्रोद्योग निर्यातीसाठी आता कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राच्या निर्यातवाढीचे उद्दिष्ट सहजशक्य असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात भारताची वस्त्रोद्योग निर्यात ४३ अब्ज डॉलर्सवर होती. तत्पूर्वी ती ३३ अब्ज डॉलर्सवर होती. ऑस्ट्रेलियासोबत भारताने नुकतेच मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्य करार केला आहे. युरोपियन युनियन, कॅनडा, इंग्लंड, आणि गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलच्या (GCC)सदस्य देशांसोबतही असेच करार करण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे गोयल यांनी सांगितले.

भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सध्या चांगली वाढ होत आहे. त्यामुळेच येत्या २०३० अखेरीस भारत वस्त्रोद्योग निर्यातीचे १०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट सहज पार करेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

देशातील कापूस उत्पादनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रति हेक्टर ५०० किलो उत्पादनाचे भारताचे प्रमाण जगाच्या प्रमाणाच्या निम्मे भरते. उत्पादनाचे प्रमाण कमी असल्याने सध्या कापसाच्या किंमती वाढल्या आहेत. किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागतो आहे. उत्पादनाचे प्रमाण वाढले तर शेतकरी आणि उद्योग क्षेत्रालाही आर्थिकदृष्ट्या परवडेल असे संतुलन राखता येईल, असे गोयल म्हणाले आहेत.

कापूस उत्पादन वाढवण्यासाठी जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान, कच्चा माल, अत्याधुनिक रसायने यांच्या वापरासाठी आपण सज्ज असायला हवे. तरच आपले उत्पादन, उत्पादकता वाढेल अन आपल्या उत्पादनांना जगात मागणी वाढेल, असेही गोयल यांनी नमूद केले आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताला निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आपण त्यांचा योग्य वापर केला तरच त्या संधीचं आपल्याला सोनं करता येणार आहे.

ऑस्ट्रेलियातील कापूस उत्पादक हा केवळ शेतकरी नाही तर तो ड्रोन चालक आहे, डाटा ॲनलिस्ट आहे, कृषीतज्ज्ञही आहे. उपजतच कष्टाळू व बुद्धीमान असलेल्या भारतीय शेतकऱ्यांचे सामर्थ्य आपण ओळखायला हवे, त्यांना शेतीसोबतच संलग्न क्षेत्रातून स्वयंपूर्ण होण्याची संधी दिली पाहिजे, असेही गोयल यांनी नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT