पंजाबमध्ये लवकरच मोफत वीजपुरवठा !

राज्यात वीजपुरवठ्याची मोठी समस्या आहे. पंजाबमधील वीजगळतीचे ,वीजचोरीचे प्रमाणही लक्षणीय राहिले आहे. वीजगळतीमुळे राज्याच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो.
Free Power
Free PowerAgrowon
Published on
Updated on

पंजाबमधील जनतेला लवकरच मोफत वीज मिळणार असून त्यासंदर्भातील निर्णयासाठी नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann)आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत जनतेला ३०० युनिट वीज मोफत देण्याचा फार्म्युला ठरवण्यात आला आहे. पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, ऊर्जा सचिव दिलीप कुमार, पंजाब राज्य वीज महामंडळाचे (PSPCL) मुख्य कार्यकारी अधिकारी बलदेव सिंग शरन यावेळी या बैठकीस हजर होते.

Free Power
नैसर्गिक शेतीः मदत आणि मुदतही वाढली

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासन पूर्तीसाठी भगवंत मान प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या प्रीपेड मीटर्सलाही विरोध केलेला आहे.

आधीच पंजाबची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर मोफत वीज पुरवठ्यामुळे राज्याला आणखी किती खर्च करावा लागेल? यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थ खात्यासह ऊर्जा विभागाचे उच्चाधिकारी या बैठकीस हजर होते.

Free Power
भारताच्या केळी, बेबी कॉर्नला कॅनडाची बाजारपेठ उपलब्ध

पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबतची बैठक सुफळ ठरल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. लवकरच आपण पंजाबसाठी एक चांगली घोषणा करणार असल्याचेही मान म्हणाले आहेत.

दरम्यान राज्यात वीजपुरवठ्याची मोठी समस्या आहे. पंजाबमधील वीजगळतीचे ,वीजचोरीचे प्रमाणही लक्षणीय राहिले आहे. वीजगळतीमुळे राज्याच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो. अशावेळी केंद्र सरकारकडून वीजगळती रोखण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशींना विरोध करत राज्य सरकारने मोफत वीज देण्याचे आश्वासन पाळण्याचा चंग बांधला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com