Parli News: ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संकटातील शेतकऱ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मदतीचे पॅकेज दिले आहे. केंद्राचे पथकही येऊन गेले. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात कुचराई करणार नाही,’’ असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले..सिरसाळा (ता. परळी) येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून शुक्रवारी (ता.७) शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला श्री. चौहान मार्गदर्शन करीत होते..Shivraj Singh Chouhan: टॅरिफ बनले शस्त्र; पण भारत दबावाखाली झुकणार नाही.ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयांक गांधी, केंद्रीय कृषी सहसचिव अजितकुमार साहू, राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, विक्रमकुमार, रवी झुनझुनवाला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, श्री. वंगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..श्री. चौहान म्हणाले, ‘‘उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याला प्राधान्य आहे. उत्तम बियाणे उपलब्ध व्हावे याकडे कटाक्ष आहे. अतिवृष्टी, दुष्काळ अशा दोन्ही विरोधाभासी स्थितीत तग धरणारे व जास्त उत्पादन देणारे पीक येण्यासाठी बियाणे उपलब्ध करण्यावर भर देत आहोत. नकली बियाणे व इतर शेतीविषयक निविष्ठा विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही..Shivraj Singh Chauhan:शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची घोषणा .प्रक्रिया उद्योग उभारून शेतीमालाला दर कसा मिळवून देता येईल यावरही प्रयत्न सुरू आहेत. जिथे जास्त बाजार भाव आहे, अशा कुठल्याही बाजारपेठेत शेतकऱ्याने आपला माल विक्रीस नेला तर त्यासाठीचे वाहन भाडे सरकार देईल, अशी मदत करण्याची योजना आणण्याचा विचार सुरू आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता एकात्मिक पीक पद्धतीकडे तसेच शेतीला पूरक उद्योग जोडण्याकडे शेतकऱ्यांना वळावे लागेल.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग रुद्राक्ष यांनी केले..‘मनरेगाचा ६५ टक्के निधी पाण्यावर खर्च करू’‘शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी मनरेगाचा ६५ टक्के निधी केवळ पाणी जमिनीत साठविण्यासाठी खर्च केला जाईल, अशी व्यवस्था करू,’’ असे श्री. चौहान यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.