विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी हरियाणात संकेतस्थळ

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेबाबतची तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला एक क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकावरून आपल्या तक्रारीचे स्टेटस तपासता येणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेबाबतच्या (PMFBY) तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी हरियाणा सरकारने एक संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. राज्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री जे. पी. दलाल यांच्याहस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेबाबतची (PMFBY) तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला एक क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकावरून आपल्या तक्रारीचे स्टेटस तपासता येणार आहे.

Crop Insurance
पंजाबमध्ये लवकरच मोफत वीजपुरवठा !

२०१६ पासून हरियाणात प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत राज्यातील खरीप हंगामात घेतलेल्या जाणाऱ्या बाजरा, कापूस, मका, भातपीक, बार्ली या पिकांना विमा संरक्षण देण्यात येते. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी, सूर्यफूल या पिकांना विम्याचे संरक्षण पुरवण्यात येते.

Crop Insurance
अखेर तेलंगणा सरकारकडूनच भातपिकाची खरेदी !

२०१६ ते २०२१ दरम्यान खरीप हंगामासाठी ८२.५९ लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यापैकी २०.८० लाख शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्यापोटी ५,१३९ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

Crop Insurance
कसे वाढणार पंजाबमध्ये अन्य पिकांचं क्षेत्र ?

२०२१ च्या खरीपापर्यंत या योजने अंतर्गत ४८०० कोटींचा प्रीमियम भरण्यात आला अन विम्याच्या दाव्यासाठी ५१३९ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना ३०० ते ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळाला असून शेतकऱ्यांनी भरलेला विम्याचा प्रीमियम १५०० कोटी रुपये होता.

शेतकऱ्यांचा प्रीमियम, राज्य सरकारचा वाटा आणि केंद्र सरकारचा वाटा अशा पद्धतीने विम्याचे प्रारूप हरियाणात राबवण्यात येते. शेतकऱ्यांच्या प्रीमियमच्या तुलनेत विमा कंपन्यांकडून जास्त परतावा देण्यात येणाऱ्या काही मोजक्या राज्यांपैकी हरियाणा एक असल्याचे दलाल म्हणाले आहेत. त्यामुळेच तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचेही दलाल यांनी नमूद केले आहे.

राज्य सरकारकडून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा असे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून 'मेरी फसल-मेरा ब्योरा' या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विम्याचे दावे निकाली काढण्यात येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com