Jodhpur News: ‘‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अजूनही चिंताजनक आहे. राजस्थानात काम करणाऱ्या काही तज्ज्ञांचे मत आहे की, ‘मारवाडी मानसिकता’ हा विचार त्या समस्येवर उपाय ठरू शकतो. राजस्थानातील अत्यल्प पर्जन्य व आव्हानात्मक हवामान असूनही, शेतीतील अपयशामुळे येथील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, असे जोधपूर येथील केंद्रीय कोरडा प्रदेश संशोधन संस्थेचे संचालक (आयसीएआर) डॉ. एस. पी. एस. तंवर यांनी सांगितले. .पत्र सूचना कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी जोधपूरमधील ‘आयसीएआर’ भेटीचे आयोजन केले होते. राजस्थानमधील शेती, सौरऊर्जा प्रकल्प, पाण्याचे व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन आणि प्रकल्पांची पाहणी करण्यात आली..Agriculture Fraud: कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करणार ‘यशदा’चे महासंचालक.श्री. तंवर म्हणाले, की राजस्थानच्या कोरड्या प्रदेशात फक्त २०० ते ६०० मिलिमीटर एवढाच वार्षिक पाऊस पडतो; तरी येथील लोकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी साठवण्याच्या विविध तंत्रांचा विकास केला आहे. महाराष्ट्रात पाऊस मुबलक प्रमाणात असला तरी तेथे शेतीत अपयश आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे..Agriculture Officers: कृषी अधिकाऱ्यांना मिळणार १३२७५ लॅपटॉप.मारवाडी मानसिकता म्हणजे...मारवाडी मानसिकता म्हणजे कमाई करूनच खर्च करणे, कमाईच्या अपेक्षेवर खर्च न करणे. हीच शहाणी विचारसरणी राजस्थानातील शेतकऱ्यांना तोटा टाळण्यास मदत करते. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या गुंतवणुकीचा धोका घेत मोठ्या उत्पादनाची अपेक्षा ठेवतात, तर राजस्थानातील शेतकरी आपल्या मर्यादेत राहून शेती करतात. ते कधीही जोखीम घेऊन पैसा लावत नाहीत, असे श्री. तंवर यांनी सांगितले..‘शेतीतील विविधता गरजेची’श्री. तंवर म्हणाले, ‘‘राजस्थानने आज पावसाच्या पाण्याचे साठवण तंत्र विकसित केले असले तरी, त्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती. राजस्थानने ती पद्धत पुढे अंगीकारली. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी शेतीत विविधता आणणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तरी आर्थिक संकटाचा धोका कमी होतो.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.