भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीत आंध्र प्रदेश अव्वल !

सागरी उत्पादनांच्या निर्यातीत अमेरिका गेल्या ११ वर्षांपासून नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. अमेरिकेनंतर चीनचा नंबर लागतो. चीननंतर जपानचा नंबर लागतो.
Andhra Pradesh contributes 43 per cent to India's total marine exports
Andhra Pradesh contributes 43 per cent to India's total marine exportsAgrowon
Published on
Updated on

भारताच्या सागरी उत्पादनांची निर्यात (Marine Exports) २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ७७४० दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे. यातील ४० टक्के निर्यातीचा वाटा एकट्या आंध्र प्रदेशाचा आहे.

Andhra Pradesh contributes 43 per cent to India's total marine exports
भारताच्या केळी, बेबी कॉर्नला कॅनडाची बाजारपेठ उपलब्ध

गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या भारताची सागरी उत्पादनांच्या निर्यातीत (Marine Exports) यंदा ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ओडिशा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील कोळंबीच्या निर्यात यंदा वाढ झाल्याची नोंद आहे.

Andhra Pradesh contributes 43 per cent to India's total marine exports
जुलैपर्यंत ३५ लाख टन गहू निर्यातीचे करार

चीनकडून १३३ भारतीय निर्यातदार कंपन्यांवर निर्बंध घालण्यात आल्यानंतरही भारताला आपल्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करणे शक्य झाले आहे. सरकारी आकड्यानुसार या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीत आंध्र प्रदेशाचा वाटा ४३ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या निर्यातीत आंध्र प्रदेशाचा वाटा ३८ टक्के होता.

आंध्र प्रदेशातील दोन्ही गोदावरी जिल्हे माशांच्या निर्यातीत अग्रेसर राहिले आहेत. याखेरीज कृष्णा, गुंटूर, प्रकाशम,नेल्लोर, विशाखापट्टणम व श्रीकाकुलम जिल्ह्यातील काही भागांत मत्स्यव्यवसाय जोरात चालतो. या जिल्ह्यांनीही राज्याच्या सागरी उत्पादन (Marine Exports) निर्यातवाढीत भर घातली आहे.

Andhra Pradesh contributes 43 per cent to India's total marine exports
इजिप्तकडून भारतीय गव्हाच्या खरेदीची शक्यता; शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

मरीन प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (MPEDA) दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने ७७४० दशलक्ष डॉलर्सची सागरी उत्पादने निर्यात केली आहेत. प्रत्यक्षात यावर्षी सागरी उत्पादनांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ७८०९ दशलक्ष डॉलर्स ठेवण्यात आले होते. या वर्षात भारताने जगभरातील १२१ देशांत आपली सागरी उत्पादने पाठवली आहेत.

सागरी उत्पादनांच्या निर्यातीत अमेरिका गेल्या ११ वर्षांपासून नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. अमेरिकेनंतर चीनचा नंबर लागतो. चीननंतर जपानचा नंबर लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com