Maize Agrowon
ॲग्रोमनी

Maize, Chana Rate : मका, तूर, हरभरा, कापूस, सोयाबीन वधारले

NCDEX मध्ये ३ एप्रिलपासून मका (ऑगस्ट २०२३) व हळद (ऑक्टोबर २०२३) साठी व्यवहार सुरू होतील.

डॉ. अरुण कुलकर्णी

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २५ ते ३१ मार्च २०२३

या  सप्ताहात हळद (Turmeric), कांदा (Onion) व टोमॅटो (Tomato) वगळता सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या. सर्वांत लक्षणीय वाढ मक्यामध्ये (९.६ टक्के) झाली. त्याखालोखाल तूर (४.४ टक्के) व हरभरा (३.१ टक्के) यांच्यात वाढ झाली. कापूस व सोयाबीन यांच्या किमतीही या सप्ताहात वाढल्या.

मार्च महिन्यात कापसाची आवक काहीशी कमी झाली. मका, मूग व सोयाबीन यांची आवक पण कमी झाली. हळद व हरभरा यांची आवक मात्र वाढत आहे. कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. कांद्याच्या किमतीतील घट अजूनही चिंताजनक आहे.

NCDEX मध्ये ३ एप्रिलपासून मका (ऑगस्ट २०२३) व हळद (ऑक्टोबर २०२३) साठी व्यवहार सुरू होतील.

३१ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालीलप्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६०,६८० वर आले होते. या सप्ताहात ते १.२ टक्क्याने वाढून रु. ६१,४०० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स भावसुद्धा २ टक्क्यांनी वाढून रु. ६२,१८० वर आले आहेत.

जून फ्यूचर्स रु. ६३,२२० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने वाढून रु. १,५१८ वर आले होते.

या सप्ताहात ते पुन्हा २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,५५९ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६५ वर आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवरी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती २.२ टक्क्यांनी वाढून रु. २,१४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ९.६ टक्क्यांनी वाढून रु. २,३४६ वर आल्या आहेत. '

फ्यूचर्स (एप्रिल डिलिव्हरी) किमतीसुद्धा ८.४ टक्क्यांनी वाढून रु. २,३३२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,३५९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.६ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ६,९९६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्याने घसरून रु. ६,९०१ वर आल्या आहेत.

एप्रिल फ्यूचर्स किमती ०.६ टक्क्याने घसरून रु. ६,८५६ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ६,८६२ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ०.६ टक्क्याने कमी आहेत. आवक वाढत्या पातळीवर आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात सप्ताहात २.६ टक्क्यांनी वाढून ६,९९६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे.

मूग

मुगाच्या किमती फेब्रुवारी महिन्यात स्थिर होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,५०० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) ०.५ टक्क्याने घसरून रु ५,३२८ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती १.९ टक्क्याने वाढून रु. ५,४२९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात रु. ८,२५० वर आली आहे. हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची आवक घटली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल, कापसाची किंमत प्रती खंडी (३५५.५६ किलो), कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

: arun.cqr@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT