Soybean Market : परभणीत सोयाबीनचे दर वाढून पोचले पाच हजारांवर

परभणी बाजार समितीमधील सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे. सरासरी दर पाच हजारांवर पोहोचले आहेत.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Soybean Market परभणी ः परभणी बाजार समितीमधील (Parbhani APMC) सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) थोडी सुधारणा झाली आहे. सरासरी दर पाच हजारांवर पोहोचले आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दराची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी सोयाबीन अद्याप साठवून ठेवले आहे.

परभणी बाजार समितीत सोमवार (ता. २७) ते शनिवार (ता. ३१) या आठवड्यात सोयाबीनची एकूण ८०७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५०७५ ते ५१०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३१) ११० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५१५० रुपये तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Rate : सोयाबीनला काय मिळाला भाव?

गुरुवारी (ता. ३०) ११० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५१००, तर सरासरी ५०८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) १०० क्विंटल आवक होऊन किमान ५०५० ते कमाल ५१२५, तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. २८) सोयाबीनची ४३७ क्विंटल आवक होऊन किमान ५०५० ते कमाल ५१००, तर सरासरी ५०८० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २७) ५० क्विंटलची आवक झाली. दर किमान ५०५० ते कमाल ५१००, तर सरासरी ५०७५ रुपये मिळाले.

Soybean Market
Soybean Rate : देशातील बाजारात सोयाबीन दरात किती वाढ झाली?

या आधीच्या आठवड्यात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ४८०० ते ५००० रुपये होते. सोया ऑइल मिलमधील सोयाबीन खरेदीचे दर प्रतिक्विंटल ५३५० ते ५३७५ रुपये होते. त्यामुळे बाजार समितीतील सोयाबीनचे सरासरी दर पाच हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या परभणी जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांकडे अजून सोयाबीन शिल्लक असल्याचा अंदाज आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ७८०० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. परंतु त्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. त्यानंतर दर कमी दर झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे गतवर्षीचे सोयाबीन देखील शिल्लक आहे.

गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू झाले आहे. सालगड्यांना उचल देण्यासह इतर गरजांसाठी अनेक शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत. त्यामुळे आवकेत थोडी वाढ झाली आहे. येत्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे.
मोतीशेठ जैन, अध्यक्ष, अडत व्यापारी महासंघ, परभणी बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com