Sindhudurg News: लांबलेल्या पावसाचा जिल्ह्यातील आंबा हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अद्याप आंबा कलमांना मोहर येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने आंबा हंगाम महिनाभर लांबणार हे निश्चित मानले जात आहे..सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी होताच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासुन ऑक्टोबर हीट सुरू होते. त्यानंतर काहीशी थंडी सुरू होते. या कालावधीत पहिल्या टप्प्यातील आंबा मोहराला सुरुवात होते. या कालावधीत आलेला आंबा जानेवारीमध्ये ग्राहकांना चाखायला मिळतो. परंतु या वर्षी अद्याप पावसाची संततधार सुरू आहे..Mango Season : विक्रमगडमध्ये हापूस, केसर आंब्याची आवक वाढली.ऑक्टोबर संपत आला असला तरी पावसाच्या सरी जिल्ह्यात सुरूच आहेत. गेले चार-पाच दिवस तर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता सतत पाऊस पडत आहे..त्यामुळे आंबा कलमांना कुठेही मोहर फुटण्यास सुरुवात झालेली नाही. उलट पावसामुळे काही कलमांना पालवी फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात पावसाने ठाण मांडले आहे. त्याचा मोठा परिणाम आंबा हंगामावर होणार आहे..Mango Orchard Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील आंबा हंगाम हा जानेवारी मध्यापासून किंवा अखेरीपासून सुरू होतो. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या बागांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोहर येतो. परंतु या वर्षी आणखी पंधरा ते वीस दिवस मोहर फुटेल अशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम साधारणपणे महिना ते दीड महिना लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना या वर्षी फेब्रुवारीपर्यंत आंब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे..जिल्ह्यात अद्याप पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीमध्ये प्रचंड गारवा निर्माण झालेला आहे. त्याचा परिणाम आंब्याला मोहर येण्यापेक्षा पालवी फुटू लागली आहे. साधारणपणे थंडी पडल्यानंतर मोहर फुटतो मात्र तसे कोणतेही संकेत दिसत नाहीत. त्यामुळे आंबा हंगाम महिना ते दीड महिना लांबण्याची शक्यता आहे.सुशांत नाईक, आंबा उत्पादक, वेतोरे, ता. वेंगुर्ला.कलमांना पालवी आल्यानंतर हंगाम काही काळ लांबतो त्याचबरोबर पालवीमुळे तुडतुड्यांचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा बागायतदारांनी तुडतुडा नियत्रंणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा.डॉ. अजय मुंज, कीटकशास्त्रज्ञ, आंबा फळ संशोधन उपकेंद्र रामेश्वर देवगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.