Cotton Market : बाजारात मेअखेरीस कापूस आवक वाढणार

लहान शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली असली तरी मध्यम आणि मोठ्या कापूस उत्पादकांकडील साठा कायम आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Nagpur News लहान शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री (Cotton Sale) केली असली तरी मध्यम आणि मोठ्या कापूस उत्पादकांकडील साठा (Cotton Stock) कायम आहे. एप्रिल-मेपर्यंत यातील बहुतांशी साठा बाजारात येण्याची शक्यता आहे. दहा टक्के साठ्याची विक्री पुढील हंगामात होईल, असे कापूस क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदाच्या कापूस गाठी उत्पादन अंदाजात सातत्याने बदलाचे धोरण अवलंबिले. आता नव्या अंदाजानुसार देशात ३१३ कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Cotton Market
Cotton Market : एप्रिलमध्ये कापूस दरात किती वाढ होईल?

२८ फेब्रुवारीपर्यंत त्यातील १५५ लाख गाठींची आवक नोंदविण्यात आली. दरवर्षी फेब्रुवारीपर्यंत ७५ टक्के कापसाची आवक होते. यंदा मात्र हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. त्यामागे दरवाढीची अपेक्षा हे कारण सांगितले जाते.

Cotton Market
Cotton Market : कापूस दर पुढील काळात वाढतील का?

या वर्षी कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने भारतात कापूस लागवड दहा ते पंधरा टक्के कमी होण्याचा अंदाज असून, अमेरिकेत सुद्धा कापसाखालील क्षेत्र १५ ते २० टक्क्यांनी घटण्याचे संकेत आहेत. भारतीय बाजारात १५ मे पर्यंत कापसाची चांगली आवक होण्याचा अंदाज आहे.

राज्यात ३० टक्के कापूस शिल्लक

महाराष्ट्राचा विचार करता यंदा ७० लाख कापूस गाठींच्या (३५० लाख क्विंटल) उत्पादकतेची शक्यता आहे. यातील २०० लाख क्विंटल कापूस म्हणजे ४० लाख गाठी बाजारात आल्या आहेत. सुमारे ३० टक्के कापूस शिल्लक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला ८२०० ते ८४०० रुपयांचा दर मिळाला.

यंदा कापूस बाजारात अनिश्‍चितता अनुभवण्यात आली. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली. परंतु दर न वाढल्याने आता कापूस विक्रीसाठी आणला जात आहे. राज्यातील बाजारात ७० टक्के कापसाची आवक झाली आहे. उर्वरित ३० टक्के कापूस देखील मेअखेरपर्यंत बाजारात येईल.
गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com