Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ‘सीसीआय’कडून कापसाला प्रति क्विंटल ७४७१ रुपयांचा दर

Cotton Rate : यंदाच्या खरिपातील कापसाचे बाजारात आगमन झाले आहे. सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून, खासगी बाजारात सरासरी ७२८७ तर ‘सीसीआय’कडून ७४७१ रुपये दर मिळू लागला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : यंदाच्या खरिपातील कापसाचे बाजारात आगमन झाले आहे. सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून, खासगी बाजारात सरासरी ७२८७ तर ‘सीसीआय’कडून ७४७१ रुपये दर मिळू लागला आहे.

दर बघता शेतकऱ्यांचा सीसीआयला कापूस विकण्याकडे कल वाढला असून, दर दिवशी सरासरी २४४ क्विंटलची आवक सीसीआयकडे नोंदविण्यात येत आहे. या नंतरच्या काळात ती वाढेल अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाकडे बघितल्या जाते. अमरावती हा कापूस उत्पादक पट्टा असून, साधारणतः लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन होते. यंदाच्या हंगामातील कापसाचे आगमन बाजारात झाले असून, एकाधिकार मोडीत निघाल्यानंतर आता सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आठ केंद्र सुरू करण्यात आले. नांदगावपेठ केंद्रावर २४४ क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली आहे

केंद्राने लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये हमीदर जाहीर केला आहे. एफएक्यू दर्जाचा कापूस सीसीआय खरेदी करते. या अटींच्या अधीन शेतकऱ्यांच्या कापसाला सध्या सीसीआयकडून सरासरी ७४७१ रुपये दर मिळू लागला आहे. हमीदराच्या तुलनेत तो ५० रुपये कमी आहे.

खुल्या बाजारात दर कमी

खासगी बाजारात कापसाला खरेदीदारांकडून किमान ७२६५ व कमाल ७३०० रुपये दर मिळत आहे. येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. २९) ६० क्विंटल कापसाची आवक झाली असून सरासरी ७२७८ रुपये दर मिळाला. हा दर हमीदराच्या तुलनेत २४३ रुपये कमी आहे. मात्र सीसीआयच्या अटींमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापूस विक्रीस नेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT