Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाची २५ लाख क्‍विंटलची आवक

Cotton Rate : संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालावत उत्पादकताही घटली.

Team Agrowon

Wardha News : संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालावत उत्पादकताही घटली. असे असताना जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत २५ लाख १९ हजार २७० क्‍विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली आहे.

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात सुरवातीला पावसाने खंड दिला. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यानंतर जूनपासून पावसाची संततधार होती. मॉन्सून संपल्यावरही अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. काही भागात अतिवृष्टीची देखील नोंद झाली. या साऱ्याचा फटका कापूस उत्पादकांना बसला.

कापूस पिकात किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. प्रतही खालावली. त्यामुळे यंदाच्या हंगामात अपेक्षित उत्पादकता होणार नाही, अशी शक्‍यता अभ्यासक वर्तवित होते. मात्र, जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत २५ लाख क्‍विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली आहे.

यावर्षी कापसाच्या भावात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, तसेही काही घडले नाही. सुरवातीच्या काळात कापसाचे दर दबावात होते. आता कापसाला ७००० रुपयांच्या पुढे दर मिळत आहेत. त्यामुळे उत्पादकतेसोबतच कापसाच्या दरानेही शेतकऱ्यांची यंदा निराशाच केली.

हिंगणघाट बाजार समितीत सर्वाधिक ८ लाख २७ हजार ३९८ क्‍विंटल कापसाची आवक झाली. पुलगावमध्ये ५ लाख ५३ हजार ०९७, आर्वीत ३ लाख ९५ हजार ०९७, वर्धा येथे तीन लाख ९५ हजार ५७, समूद्रपूरमध्ये १ लाख ५४ हजार ७८९, सिंदी रेल्वे येथे १ लाख ४६ हजार ८०४ क्‍विंटल अशी आवक राहिली.

सोयाबीनची साडेनऊ लाख क्विंटल आवक

जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची ९ लाख ४९ हजार ३४५.२७ क्‍विंटल आवक झाली. तर तुरीची ४० हजार २१६, हरभऱ्याची ३ लाख ६६ हजार ३४१, गव्हाची ३४ हजार ८६४ आणि भुईमुगाची तीन हजार ६९८ क्‍विंटल आवक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT