Cotton Market : कापसाला घटती आवक, वाढत्या निर्यातीचा फायदा

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. पण देशातील कापसाला मागणी, वाढती निर्यात आणि बाजारातील कमी होत जाणारी आवक यामुळे देशातील कापूस भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

जागतिक बाजारात सध्या कापसाच्या वाढत्या पुरवठ्यामुळे आणि काही देशांमध्ये उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्याने दरावर दबाव येत असल्याची चर्चा आहे. पण खर कारण आहे हेजर्स आणि सट्टेबाजांचे. सोमवारी दुपारपर्यंत ८७.४५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. म्हणजेच क्विंटलमध्ये १६ हजार १०० रुपये. तर देशातील वायद्यांमध्ये भाव होता ६१ हजार ७०० रुपये प्रतिखंडी. म्हणजेच १७ हजार ३०० रुपये. याचाच अर्थ असा की देशातील कापूस वायद्यांमधील भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जास्त आहेत.

Cotton
Cotton Crop Management : कापूस पिकातील उर्वरित अवशेषांचे व्यवस्थापन

प्रत्यक्ष खरेदीचे भाव म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ९२.६० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता. क्विंटलमध्ये हा भाव १७ हजार रुपये होतो. तर देशात खंडीचे प्रत्यक्ष विक्रीचा भाव ६० हजार ५०० रुपये होता. क्विंटलमध्ये हा भाव १७ हजार रुपये होतो. म्हणजेच प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भाव आंतरराष्ट्रीय भावाएवढा होता. 

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत. पण कापसाचे भाव पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव ९५ सेंटच्या वर पोचला तर भारतातून पुन्हा कापूस निर्यातीला मागणी येऊ शकते. एप्रिल आणि मे महिन्यातही निर्यात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. हा घटकही बाजारात कापूस भाववाढीला आधार देणारा ठरेल. 

Cotton
Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ११ लाख ३६ हजार क्विंटलवर कापूस खरेदी

निर्यात जोमात

भारतातून आतापर्यंत जवळपास १८ लाख गाठी कापूस निर्यात झाल्याचा अंदाज आहे. तसेच आणखी ३ ते ४ लाख गाठी कापूस निर्यातीचे सौदेही झाले आहेत. म्हणजेच काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने जो अंदाज दिला की भारत २२ लाख गाठी निर्यात करेल. हा अंदाज आताच पूर्ण झाला. म्हणजेच प्रत्यक्ष निर्यात आणि सौदे मिळून २१ ते २२ लाख गाठींचा आकडा पूर्ण झाला. 

देशातील मागणी चांगली

सुरुवातीला कापूस स्वस्त होता. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापूस पुन्हा वाढणार नाही, असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी कापसाचा स्टाॅक केला नव्हता. हे उद्योग आता गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. त्यांची मागणी यापुढच्या काळातही कायम राहील. तसेच बाजारातील आवक कमी होत आहे. एप्रिलमध्ये ही आवक आणखी कमी होईल. यामुळे भावाला आधार मिळेल. याच कारणांनी देशातील कापसाचे भाव कमी होण्याची नसून दरवाढील पोषक स्थिती आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

दर वाढीला आधार

एप्रिल महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजारांची पातळी पार करण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिलनंतर बाजारातील कापूस आवक एकदम कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात कापूस भावाला चांगला आधार मिळेल आणि कापूस भाव पुन्हा सुधारतील. मे महिन्यात कापसाचा भाव ८ हजार ५०० रुपयांच्या पातळीदरम्यान पोहचू शकतो, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापसाला सधया सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर कमाल भाव ८ हजार ४०० होता. हा भाव चांगल्या गुणवत्तेच्या आणि लांब धाग्याच्या कापसाला मिळाला. तर किमान भाव ७ हजारांपासून सुरु होत आहे. पण हा भाव फरदड कापसाला मिळाला. बाजारातील आवकही कमी होत आहे. काल देशातील आवक ५८ हजार ८०० गाठींच्या दरम्यान झाली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com