Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market : म्हाकुळ माशाला किलोला ११० रुपये दर

Squid Fish : वातावरणातील बदलांचे परिणाम समुद्रातील मासळीवर होत आहेत. सध्या बांगडा, कोळंबी मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने दर वधारले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : वातावरणातील बदलांचे परिणाम समुद्रातील मासळीवर होत आहेत. सध्या बांगडा, कोळंबी मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने दर वधारले आहेत. तर ट्रॉलिंगच्या नौकांना मिळणाऱ्या बेबी म्हाकुळ माशाला किलोला १०० ते ११० रुपये दर मिळत आहेत. हा दर पुरेसा नसल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.

ऑगस्ट महिन्यात गिलनेट, ट्रॉलिंगद्वारे तर १ सप्टेंबरपासून पर्ससिननेट जाळीचा वापर करून मासेमारी सुरू झाली आहे. यंदा वादळी वारे, पाऊस अनियमित आहे. खोल समुद्रातील मासा किनाऱ्याकडे येण्यासाठीचे वारे अजूनही वाहू लागलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मिळणारा मासा अपेक्षित जाळ्यात सापडलेला नाही.

श्रावण महिना असल्यामुळे अनेक मच्छीमारी नौका बंदरावरच उभ्या होत्या. तर काही नौका मासेमारीला जात आहेत, परंतु त्यांना अपेक्षित मासे मिळत नाहीत. हंगामाच्या सुरुवातीला मिळणारा बांगडा मासा आता कमी झाला आहे. गिलनेटच्या नौकांना अवघा ३ ते ४ किलो बांगडा मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांचा खर्चही वसूल होत नाही. सध्या मासळी बाजारातही बांगड्याचा दर १०० ते १२० रुपये किलो तर टायनी कोळंबी १०० रुपयांवरून १५० रुपये किलोने विकली जात आहे.

ट्रॉलिंगच्या नौकांना बेबी म्हाकुळ मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एका नौकेला साधारणपणे एक ते दीड टन म्हाकुळ मिळत आहे. परंतु किलोचा दर १०० ते ११० रुपयेच आहे. हा दर ३०० ते ३५० रुपये किलो असणे अपेक्षित आहे. एका फेरीला नौकांना १ ते सव्वा लाख रुपये मिळत आहेत. त्यामधून खर्च वजा जाता अपेक्षित फायदा मिळत नाही.

मिळणाऱ्या मासळीमधून तीन लाखांहून अधिक उत्पन्न अपेक्षित आहे. त्यासाठी मासळी खरेदी करणाऱ्या दलालांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मच्छीमार अप्पा वांदरकर यांनी सांगितले. तर गिलनेटने मासेमारी करणारे श्रीदत्त भुते म्हणाले, की किनाऱ्यापासून दोन किमी अंतराच्या परिसरात अपेक्षित मासळी मिळत नाही. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. एका फेरीचा खर्चही हाती येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: ३ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा; पावसाला पोषक स्थिती

Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर

Zero Residue Grapes Production: ‘झीरो रेसिड्यू’ द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे

Sugarcane Water Management: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

SCROLL FOR NEXT