Fish Market : कोळंबीची आवक वाढल्याने दरात घसरण

Prawns Market Rate : कधी नव्हे ती कोळंबीची प्रचंड आवक वाढल्याने १०० रुपये प्रतिकिलो दराने कोळंबीची विक्री केली जात आहे.
Prawns
Prawns Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : तालुक्यातील केळशी येथील किनारा मोहल्ला येथील मच्छीमारांच्या जाळ्यात कोळंबीचा लॉट सध्या लागत आहे. कधी नव्हे ती कोळंबीची प्रचंड आवक वाढल्याने १०० रुपये प्रतिकिलो दराने कोळंबीची विक्री केली जात आहे.

दापोली तालुक्यातील केळशी येथील किनारा मोहल्ला येथील मच्छीमारांच्या जाळ्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मच्छीमार खुशीत असले तरी वाढलेल्या कोळंबीच्या आवकेमुळे ५०० रुपये प्रतिकिलो दराने दहा दिवसांपूर्वी विकली जाणारी कोळंबी आता १०० रुपये प्रतिकिलो दराने विकावी लागत आहे.

Prawns
Sports Fishing : ‘स्पोर्ट्स फिशिंग’मधून पर्यटनाला चालना

यापूर्वी जागेवरच विकली जाणारी कोळंबी आता दापोली बाजारपेठेत येऊन मच्छीमार महिला विक्रेत्यांना ठिकठिकाणी बसून कोळंबी विकावी लागत आहे. असे असले तरी कोळंबीच्या उतरलेल्या दरामुळे मच्छीमारांना मात्र चांगलाच घाटा सहन करावा लागत आहे.

मच्छी ही नाशिवंत असते. त्यामुळे मच्छीची विक्री तातडीने करावी लागते. तसे झाले नाही तर मच्छीची किंमत मातीमोल होते. केळशी किनारा मोहल्ला हा तसा मोठ्या लोकवस्तीचा मोहल्ला आहे. या ठिकाणी दालदी समाजवर्गातील मच्छीमार मोठ्या प्रमाणात आहेत. स्वच्छ आणि ताजी मासळी मिळण्याचे हे ठिकाण ओळखले जाते.

Prawns
Fish Production : निर्यातक्षम मत्स्य उत्पादन प्रकल्प राबविणार

या ठिकाणाहून केळशी या गावासह केळशी परिसरातील उंबरशेत, मांदिवली, रावतोळी कवडोली, रोवले, वांझळोली आमखोल, डौली,आंबवली बुद्रुक, आतगाव या दापोली तालुक्यातील गावांसह मंडणगड तालुक्यातील खारी, साखरी, जावळे, आंबवली खुर्द, चिंचघर, शेवरे, केंगवळ, वेळास आदी गावात मासळी विकली जाते.

मुख्य म्हणजे येथील महिलांची एक खासियत आहे. दापोली-मंडणगड तालुक्यात सर्वच गावांत पायपीट करत सुकी मासळी येथील महिलावर्गाकडून विक्रीचा व्यवसाय केला जातो. आवक वाढल्याने मासळीचे दर अपेक्षेपेक्षा खूपच खाली उतरल्याने मच्छीमारांची कमाईची संधी मात्र हुकली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com