स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांची चंदगडमध्ये आघाडीमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ते नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र लढतील.Sharad Pawar and Ajit Pawar Alliance: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'महायुती'तील मित्र पक्ष म्हणून सत्तेत आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राज्यात विरोधी बाकावर आहे. या दोन्ही राष्ट्रवादींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादींच्या या दोन्ही गटांनी आघाडी करून भाजपला धक्का दिला आहे. हे घडले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये...! .विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी जाहीर केली. ते नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र लढतील..Sharad Pawar: संसार उद्ध्वस्त करणे म्हणजे विकास नव्हे; शरद पवार.येथील माजी आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर डॉ. नंदा बाभूळकर- कुपेकर ह्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. .Hasan Mushrif: शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये यासाठी उपाययोजना करा : मंत्री हसन मुश्रीफ.यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, ''दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची आघाडी चंदगडमधील निवडणुकीसाठी झाली आहे. युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तिथं एकत्रिपणे लढायचे. पण ज्या ठिकाणी जमणार नाही; त्या ठिकाणी तिथे दुसऱ्या पक्षाला घ्यायचे असेल आघाडी करायची. येथे भाजप राष्ट्रवादीशी बोलणार नसेल तर एकाकी राहणे बरे नाही. जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांची आघाडी करुन देणे. दोन पक्षांचे मतभेद असले तरी ते पुर्वाश्रमीचे एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत.''.चंदगड विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राजेश पाटील आणि महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर यांनी निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील जायंट किलर ठरले होते. ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकले होते. आता शिवाजी पाटील यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत रणनिती आखली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.