Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रब्बी हंगाम २०२५ मध्ये शुक्रवार (ता. ७)पर्यंत ५३ हजार ९६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारी १८ हजार ६२५ हेक्टर, हरभरा ३३ हजार हेक्टर, गहू १ हजार ८४५ हेक्टर, करडई ३१९ हेक्टर आदी पिकांचा समावेश आहे. अजूनही अनेक भागातील जमिनीमध्ये वाफसा नाही. जमीन तयार नसल्यामुळे या दोन जिल्ह्यांत रब्बी पेरणीची गती संथ आहे..परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. ७) पर्यंत २ लाख ७० हजार ९७७ पैकी ३७ हजार ५१२ हेक्टरवर (१३.८४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी १६ हजार ३८६ हेक्टर (१६.८१ टक्के), गव्हाची ३४ हजार ९३४ पैकी ४३९ हेक्टर (१.२६ टक्के), मक्याची १ हजार ५०२ पैकी ४९ हेक्टर (३.२६ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख ३४ हजार ८४१ पैकी २० हजार ५९३ हेक्टर (१५.२७ टक्के) पेरणी झाली..Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी.करडईची १ हजार ६०२ पैकी ३२ हेक्टर (२ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६९ हजार २२० पैकी १६ हजार ४४८ हेक्टरवर (८.०२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ९ हजार ५६७ पैकी २ हजार २३९ हेक्टर (२३.४० टक्के), गव्हाची ३३ हजार ४६९ पैकी १ हजार ४०६ हेक्टर (४.०२ टक्के), मक्याची ८६७ पैकी ५९ हेक्टर (६.८ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २१ हजार ६२ पैकी १२ हजार ४१० हेक्टर (१०.२५ टक्के) पेरणी झाली. करडईची २ हजार ५२ पैकी २८७ हेक्टर (१३.९८ टक्के) पेरणी झाली, असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..हिंगोली जिल्हा रब्बी २०२५ पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीहिंगोली ३८४२२ ६३५७ १६.५५कळमनुरी ५४०३८ ३६८५ ६.८२वसमत २८८६२ २८७० ९.९४औंढानागनाथ २५२२१ १४२० ५.८६सेनगाव २३६७६ २११६ ८.९४.Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के.परभणी जिल्हा रब्बी २०२५ पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीपरभणी ५२६५१ ८८२० १६.७५जिंतूर ५१९९२ १६२५ ३.११सेलू ३०६७५ ९८५७ ३२.१३मानवत २०११३ ४८४५ २४.०९.पाथरी १८१६९ ७१४ ३.९३सोनपेठ १६६१८ २०२६ १२.१९गंगाखेड २९९२१ ६१११ २०.४२पालम १८६०९ ६५० ३.४९पूर्णा ३२२२६ २८७४ ८.९२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.