Delhi Car Blast: दिल्लीत सोमवारी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आग लागली आहे. यामुळे जवळची तीन ते चार वाहने जळून खाक झाली आहेत. .एएनआयच्या वृत्तानुसार, ही घटना स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ घडली असल्याचे दिल्ली अग्निशमन विभागाने म्हटले आहे. "या घटनेत रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती स्थिर आहे," असे लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले..या स्फोटाच्या घटनेनंतर राजधानीत दिल्लीत हाय अलर्ट जारी केला आहे. अनेक जखमींना तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी स्फोट होऊन आग लागली तिथे अग्निशमन दलाच्या एकूण ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. हा स्फोटामागील कारण अद्याप समजलेले नाही..सध्याच्या स्थितीत काही काहीही सांगू शकत नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे, असे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांना माहिती मिळाली होती की चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाला आहे. .Water Scarcity: जलसंकटाचे सावट.या घटनेची माहिती मिळताच सात पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. सायंकाळी ७.२९ वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली. सर्व पथके घटनास्थळी आहेत, असे अग्निशमन विभागाचे उपमुख्य अधिकारी ए. के. मलिक यांनी म्हटले आहे..Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर.पंतप्रधान मोदी यांनी घेतली परिस्थितीची माहिती या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ दिल्ली पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. एनएसजी, एनआयए आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. .उत्तर प्रदेशातही रेड अलर्ट जारी दरम्यान, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.