Fish Market : बाजारात बांगडा मासा मुबलक

Fish Farming : जून आणि जुलैमध्ये बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली. त्यामुळे ताजा माशांची आवक बाजारात सुरू झाली आहे.
Fish
FishAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जून आणि जुलैमध्ये बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली. त्यामुळे ताजा माशांची आवक बाजारात सुरू झाली आहे. बांगडा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बांगड्याचे दर घसरले आहेत. इतर माशांचे भाव मात्र सुधारले आहेत.

पावसाने विश्रांती घेतली असून वारेही थांबले आहेत. त्यामुळे समुद्र शांत आहे. मच्छीमारांना समुद्रात ये-जा करणेही सुरक्षित झाले आहे.

Fish
Grunion Fish : ग्रुनियन माशांचे प्रजनन ः जीवशास्त्रातील अनोखी घटना

यंदा सुरूवातीपासूनच मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा चांगल्याप्रकारे सापडत आहे. त्यामुळे बांगड्याचा दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो आहे. कोळंबीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यामुळे, त्याचे दरही घसरले आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा, दापोलीतील हर्णै या सारख्या मोठ्या बंदरांवर माशांची उलाढाल सुरू झाली आहे.

Fish
Fish Market : मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा, व्हाईट चिंगळ

बांगडा वगळता पापले़ट, सरंगा, म्हाकूळ, बोंबील, सुरमई यासारखे मासे काही प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे दर वधारलेले आहेत. सध्या ट्रॉलिंग, गिलनेटच्या साह्याने मासेमारी सुरू आहे.

१ सप्टेंबरपासून पर्ससिननेट मासेमारी सुरू होईल. त्यानंतर बाजारातील माशांचे दर कमी होतील, असा मच्छीमारांचा अंदाज आहे. रत्नागिरीतील किनारी भागात केंड माशाचा त्रास मच्छीमारांना जाणवत आहे. हा मासा झुंडीने राहतो आणि जाळी फाडतो. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होते.

सध्याचे माशांचे दर

बांगडा - ८० ते १०० रु. किलो

कोळंबी - २५० ते ३०० रु. किलो

टायगर प्रॉन्स - ५०० ते ५५० रु. किलो

सुरमई - ८०० ते १००० रु. किलो

पापलेट - ७०० ते ८०० रु. किलो

मोडोसा - ६०० रु. किलो

हलवा - ६०० ते ८०० रु. किलो

बोंबील - २३० ते ३०० रु. किलो

सौंदळ - ३०० ते ३३० रु. किलो

समुद्र काही प्रमाणात खवळलेला असल्याने यांत्रिक बोटी अद्यापही समुद्रात गेलेल्या नाहीत. दरम्यान, ज्या बोटी समुद्रात जात आहेत त्यांच्या जाळ्यात बांगडा बंपर प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे, बांगड्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
- सर्फराज बेबल, मासळी विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com