lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नगरला ‘लम्पी स्कीन’ बाधितांत वासरांची संख्या जास्त

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ५ हजार ५९४ जनावरे लम्पी स्कीनने बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक संख्या वासरांची आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ५ हजार ५९४  जनावरे लम्पी स्कीनने बाधित झाली आहेत. यंदा लम्पी स्कीनने बाधित होणाऱ्या जनावरांत वासरांची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत बाधित जनावरांत सुमारे १३५७ वासरे आहेत.  

जूनपासून या आजाराचे प्रमाण वाढले आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी जनावरांचे बाजार, चारा वाहतूक, पशुप्रदर्शने, जनावरांचे संबंधित उत्सव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय गायवर्गीय जनावरे, चारा वाहतुकीस निर्बंध घातले आहेत. बाधित भागात पशुधनाची ऑनलाइन खरेदी-विक्रीही बंद केली आहे.

बाधित भागातून बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी, अन्य कोणताही भाग, उत्पादन, असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी बंदी घातली आहे. बाधित परिसरात स्वच्छता ठेवून व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे, ‘लम्पी स्कीन’ चा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्याने वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवले आहे.

नगर जिल्‍ह्याचा विचार केला तर यंदा जिल्ह्यात ५ हजार ५९४ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली आहे. त्यात ४४५७ जनावरे आजारातून बरी झाली आहेत. तर ३१० जनावरांचा मृत्यू झाला. बाधित जनावरांत सुमारे ३५७ वासरे आहेत. त्यातील १०१२ वासरे या आजारातून बरी झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने वासरांच्या मृत्यूचा आकडा निश्चित केला नसला तरी यंदा बाधित वासरांची संख्या वाढली आहे.

नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित वासरांची संख्या
अकोले - १७, जामखेड - ८, कर्जत - २०, कोपरगाव - १६३, नगर - ७४, नेवासा - १२९, पारनेर - ४२, पाथर्डी - १३७, राहाता - ७३, राहुरी - ३३७, संगमनेर - ९, शेवगाव - ११४, श्रीगोंदा - १८५, श्रीरामपूर - ४९.

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा बाधित जनावरांत वासरांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वासरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT