Lampy Skin
Lampy SkinAgrowon

Lampy Skin : लम्पी स्कीनमुळे दगावलेल्या ३० टक्‍के जनावरांसाठी निधीची प्रतीक्षाच

७० टक्‍के पशुपालकांना भरपाई मिळाली असली तरी अद्याप ३० टक्‍के पशुपालक भरपाईपासून वंचित आहेत. त्यांच्याकरिता निधीची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी आहे.
Published on

Yavtmal News : लम्पी स्किन आजारामुळे (Lampy Skin) दगावलेल्या जनावरांसाठी अनुदान देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १२४९ मृत जनावरांपैकी ५७० जनावरांसाठी आतापर्यंत १ कोटी ३६ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

उर्वरित पशुपालकांच्या अनुदानाचे (subsidy) प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे.

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा (Lampy Skin) प्रादुर्भाव झाला होता. ६४ गावांना याचा सर्वाधिक फटका बसला. ज्या पशुपालकांची जनावरे दगावली त्यांना दिलासा देण्याकरिता शासनाकडून अनुदान योजना जाहीर करण्यात आली.

Lampy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीनने जनावर दगावलेल्या ३९० पशुपालकांना मदतीची प्रतीक्षा

त्यानुसार बैलासाठी २५०००, गाय ३०००० तसेच वासराकरिता १६००० रुपये देण्यात येणार होते. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत १२४९ जनावरांचा मृत्यू झाला. यातील १०७७ प्रकरणात पशुपालकांनी भरपाईसाठी अहवाल सादर केले.

यातील ५७० पशुपालकांचे प्रस्ताव पहिल्या टप्प्यात मान्य करण्यात आले. त्याआधारे १ कोटी ३६ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

७० टक्‍के पशुपालकांना भरपाई मिळाली असली तरी अद्याप ३० टक्‍के पशुपालक भरपाईपासून वंचित आहेत. त्यांच्याकरिता निधीची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी आहे.

सध्या जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजार नियंत्रणात असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी दिली. प्रलंबित असलेल्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. २४७ जनावरांसाठीचा निधी उपलब्ध असून २५९ जनावरांसाठी निधीची गरज आहे.

Lampy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीनने जनावर दगावलेल्या ३९० पशुपालकांना मदतीची प्रतीक्षा

उपचारानंतर २३ जनावरे बरी झाली

जिल्ह्यात लम्पी स्कीनची लागण झालेल्या जनावरांची संख्या २५ हजार ६३ इतकी होती. त्यातील २३ हजार ७८८ जनावरे उपचाराअंती बरी झाली. यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com