Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : सांगली जिल्ह्यात जनावरांना लसीकरण मोहीम सुरू

Animal Care : लसीकरण युद्धपातळीवर सुरू असून ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. लसींचा पुरेसा साठा असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील जनावरांना पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य घटसर्प, फऱ्या, लम्पी स्कीन, विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण युद्धपातळीवर सुरू असून ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. लसींचा पुरेसा साठा असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. घटसर्प, फऱ्या, इव्हीटी, लम्पी स्कीन आजाराची लागण जनावरांना होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून हे लसीकरण केले जाते.

पशूसंवर्धन विभागाने जनावरांना घटसर्प, फऱ्या, इव्हीटी, लम्पी स्कीन याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. शासनाकडून घटसर्प, फऱ्या, इव्हीटी शेळ्या मेंढ्यांसाठी, लम्पी स्कीन अशासाठी ८ लाख ४६ हजार ७०० लसी प्राप्त झाल्या आहेत.

प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार त्यांच्याकडे लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. गावोगावी लसीकरणाची मोहीम केली आहे. सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या पूरपट्ट्यामध्ये १०४ गावांचा समावेश होतो.

सर्वप्रथम नदीकाठच्या गावांना विषाणूजन्य आजारांचा धोका उद्‌भवतो. दूध संघ यांच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT