Animal Vaccination : लसीकरण अयशस्वी होण्याची कारणे

Animal Health : आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण केले जाते, यानंतरही जर हा आजार जनावरांमध्ये पसरला तर त्याला लसीकरण अपयश झाले असे संबोधले जाते.
FMD Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

डॉ. स्वप्निल वानखडे, डॉ. शुभांगी व्यवहारे

आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण केले जाते, यानंतरही जर हा आजार जनावरांमध्ये पसरला तर त्याला लसीकरण अपयश झाले असे संबोधले जाते. लसीकरण अपयशाची कारणे समजून घेण्यासाठी, अनेक मूलभूत घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

प्रादुर्भावादरम्यान अनेक कारणे समोर येतात. आजारावर प्रतिबंध ठेवणे ही एक जटिल प्रक्रिया आहे. जेव्हा एखादा आजार पसरतो तेव्हा आजारावर बऱ्याचदा लसीच्या गुणवत्तेला जबाबदार धरले जाते. तर सहसा त्याची इतर अनेक कारणे असू शकतात.

प्रादुर्भाव आणि आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्राणी आणि पक्ष्यांना होणाऱ्या आजाराचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी, जनावराची प्रतिकारशक्ती, आजार आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम, जनावराचे वय आणि देखरेख, लसीकरणाची स्थिती इत्यादी अनेक घटकांचा विचार केला पाहिजे.

तापमान, हवेची घनता, हवामान, प्रदूषण इत्यादी काही पर्यावरणीय घटकांचा देखील शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही आजार जन्मापासूनच असू शकतात. बाहेरून नवीन जनावराचे आगमन, जनावराची कुठेही हालचाल होऊ देणे आणि वन्य प्राण्यांशी संपर्क यामुळे आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

लस जनावरामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण करतात. आजाराची वारंवारता आणि तीव्रता कमी करून लसीकरण हा आजार नियंत्रणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु लसीकरणाचा चांगले प्रयत्न असूनही, कधीकधी आजाराची लक्षणे दिसून येतात आणि लसीकरण अयशस्वी होते. लसीच्या गुणवत्तेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

FMD Vaccination
Animal Vaccination : जनावरांच्या आजार नियंत्रणासाठी लसीकरणाचे वेळापत्रक

लसीकरण अयशस्वी होण्याची कारणे

वय: लहान जनावराची प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. मोठ्या जनावरांची प्रतिकारक शक्ती अनेकदा विविध कारणांमुळे कमकुवत किंवा बिघडलेली असते.

जनावराच्या आईची प्रतिकारशक्ती: नवजात वासराला चिकाद्वारे उच्च पातळीचे अँटीबॉडीज मिळतात, जे संरक्षण देते. परंतु त्याउलट, जर यावेळी लसीकरण केले गेले तर हे अँटीबॉडीज रोगप्रतिकारक शक्तीच्या योग्य विकासात व्यत्यय आणतात. या कारणास्तव लसीकरणाची वेळ वेगळी ठेवली जाते. कधीकधी आईच्या कमकुवतपणामुळे किंवा नवजात वासरू योग्यरित्या दूध पीत नसल्यामुळे, त्याचे दुधात अँटीबॉडीजची पातळी पुरेशी राहत नाही.

आनुवंशिक आजार: काही जनावरांमध्ये आनुवंशिक आजारामुळे प्रतिकारशक्ती सामान्यतः कमी विकसित होते.

पौष्टिक स्थिती: जनावरामध्ये पोषक तत्त्वांची कमतरता असते त्यांना लसीकरणानंतरही प्रतिकारक शक्ती विकसित होत नाही.

ताण-तणाव: वातावरणातील बदल, अपुरे पौष्टिक आहाराचे सेवन आणि देखरेख, गैरसोयीची वाहतूक, जास्त गर्दी इत्यादी अनेक कारणे जनावरांमध्ये ताण निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या प्रतिकारक शक्तीचे कार्य कमकुवत होते. लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता निर्माण होते.

चुकीच्या स्टेनचा उपयोग: रोगप्रतिकारक प्रतिक्रिया खूप विशिष्ट आहे. म्हणून, लसीमध्ये विषाणूचा योग्य स्टेन असणे आवश्यक आहे. अन्यथा निर्माण होणारी प्रतिकारशक्ती जनावराचे योग्यरित्या संरक्षण करू शकत नाही.

गुणवत्ता: लसींमध्ये प्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रतिजन (अँटीजेन) असणे आवश्यक आहे. म्हणजेच लस चांगल्या दर्जाची असावी. अन्यथा लसीकरणानंतर रोगप्रतिकारक प्रतिसाद पुरेसा नसतो.

जुन्या किंवा कालबाह्य झालेल्या लसी: जुन्या लसींमध्ये आवश्यक प्रतिजन (अँटीजेनिक) गुणधर्म नष्ट होतात किंवा कमी होतात. अशा लसी देऊन, जनावरास अनावश्यक ताण दिला जातो.

FMD Vaccination
Animal Vaccination : जनावरांसाठी लसीकरणाचा बुस्टर डोस का आहे महत्वाचा?

चुकीची वेळ: लसीकरणाची वेळ (वय आणि हंगामानुसार), वापरण्याची पद्धत आणि प्रमाण, पुन्हा वापरण्याचा कालावधी इत्यादी गोष्टी लस उत्पादकाच्या सूचनांनुसार ठरवल्या जातात. या सूचनांचे योग्य वेळी पालन न केल्यास लसीकरण अयशस्वी होऊ शकते किंवा ते निष्प्रभ ठरू शकते. जनावरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव दिसतो. जे उद्रेकाचे रूप देखील घेऊ शकते.

लसीची अयोग्य साठवणूक आणि वापर: सूचनांनुसार लसीची साठवणूक आणि वापर करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश किंवा उष्ण तापमान लसीचा प्रभावीपणा नष्ट करू शकते. जनावरांना लसीकरण करण्यापूर्वी लगेचच लसीचे मिश्रण कमी प्रमाणात तयार करावे. लसीकरणासाठी नवीन सुई वापरावी. लस खरेदी करण्यापूर्वी, लस योग्य तापमानात ठेवली आहे की नाही आणि त्यांची काळजी घेतली आहे की नाही हे शोधून काढले पाहिजे. लसीकरणासाठी योग्य नियोजन केले पाहिजे जेणेकरून कोणताही प्राणी लसीकरणाशिवाय राहू नये.

जंतनाशक : लसीकरणापूर्वी जंतनाशक देणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारच्या ताणामुळे लसीकरणाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

सुरक्षा: लसीकरणादरम्यान जनावरास योग्यरित्या हाताळले पाहिजे, त्यांना कोणत्याही प्रकारे दुखापत होता कामा नये.

उद्रेक दरम्यान लसीकरण: लसीकरण फक्त निरोगी जनावरांमध्ये केले जाते. अन्यथा लसीचा परिणाम योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी साध्य होत नाही. कोणत्याही आजाराच्या प्रादुर्भावाच्या वेळी, आजारी आणि निरोगी जनावरे वेगळी केली जातात.

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम: प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे हवामानाशी संबंधित आजार असतात. लसीकरण कार्यक्रम या परिस्थितीनुसार असावा.

- डॉ. स्वप्निल वानखडे, ८९८३४६६८८०

(लेखक पशुविकृतीशास्त्र विभाग, अपोलो कॉलेज ऑफ व्हेटर्नरी मेडिसीन, जयपूर, राजस्थान येथे सहायक प्राध्यापक आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com