Goat Market  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Market : लोणंदला शेळ्या-मेढ्यांची विक्रमी आवक

Livestock Market : बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजार समितीच्या आवारातील शेळी-मेंढी बाजारात गुरुवारी (ता. २२) भरलेल्या आठवडा बाजारात राज्यभरातून बोकडांची विक्रमी आवक झाली.

Team Agrowon

Satara News : बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजार समितीच्या आवारातील शेळी-मेंढी बाजारात गुरुवारी (ता. २२) भरलेल्या आठवडा बाजारात राज्यभरातून बोकडांची विक्रमी आवक झाली. त्यामुळे बाजार समितीचे आवार गर्दीने फुलून गेले होते. ७ हजार बोकड व ३ हजार शेळ्या-मेंढ्यांची विक्रमी आवक झाल्याने कोट्यवधींची उलाढाल झाली.

लोणंद बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरणाऱ्या शेळी-मेंढी बाजारात शेळ्या, मेंढ्या व बोकडांची मोठी आवक होत असते. त्यामुळे लोणंदचा शेळी-मेंढी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे.

विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर, चाळीसगाव, धाराशिव, जामनेर, तसेच आजूबाजूच्या खंडाळा, फलटण, वाई, बारामती, पुरंदर, माण, खटाव, कोरेगाव, भोर आदी तालुक्यांतूनही मोठ्या संख्येने शेतकरी शेळ्या-मेंढ्या व बोकडांच्या विक्रीसाठी येथे येतात.

कर्नाटकातील बंगळूर, म्हैसूर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच कोकणातील रत्नागिरी, अलिबाग व अन्य ठिकाणांहूनही मोठ्या संख्येने खरेदीदार येथे शेळ्या, मेंढ्या व बोकडांच्या खरेदीसाठी हजेरी लावतात.

तीन कप्प्यांचे मोठे कंटेनर, ट्रक, टेम्पो जीप आदी वाहनांच्या साहाय्याने खरेदी-विक्री केलेल्या मालाची व्यापरी ने-आण करतात. पुढील आठवड्यात बकरी ईद असल्याने गुरुवारच्या आठवडे बाजारात बोकडांची सात हजारांपेक्षाही अधिक विक्रमी आवक झाली.

नेहमीपेक्षा बाजारात दोन हजार बोकडांची आवक वाढली होती. शेळ्या-मेंढ्यांची तीन हजार नगांची आवक झाली होती. एका बोकडाची १० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत विक्री झाली. सरासरी २० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे बोकड अधिक प्रमाणात विकले गेले. ६५ ते ७५ हजार रुपये किमतीच्या तीन ते ४ बोकडांची विक्री झाली.

त्यामुळे या बाजारात कोट्यवधी रुपयांची आवक झाल्याचा अंदाज आहे. डोक्यावर चाँद असलेल्या बोकडाला अधिक मागणी होती. त्याची शोधाशोध करताना खरेदीदार बाजारात दिसत होते.

लोणंद बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके-पाटील, उपसभापती भानुदास यादव, संचालक अरुण गालिंदे, सचिव विठ्ठल सपकाळ, तसेच सर्व कर्मचारी बाजार संपेपर्यंत ठाण मांडून होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT