Sheru Goat Death : बकरी ईदपूर्वीच सव्वा कोटीच्या 'शेरू'चा मृत्यू

Bakri Eid News : रमजान ईदप्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बकरी अर्थात ईद-उल-अदाह हा त्यागाचा सण म्हणून मुस्लिम धर्मीय साजरा करतात.
Sheru Goat
Sheru GoatAgrowon
Published on
Updated on

Sheru Goat Passed Away : रमजान ईदप्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बकरी अर्थात ईद-उल-अदाह हा त्यागाचा सण म्हणून मुस्लिम धर्मीय साजरा करतात.

यादिवशी मुस्लिम बांधव बकऱ्यांची कुर्बानी देतात. ईदच्या कुर्बानीसाठी बोकडांना विशेष मागणी असते. खरेदीदारांकडून कुर्बानीसाठी विशेष बकऱ्यांची निवड केली जाते. अशा बकऱ्यांसासाठी कितीही किंमत मोजायला खरेदीदार तयार असतात.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अशाच एका बकऱ्याची चर्चा रंगली होती. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात राहणाऱ्या शकील शेख यांनी शेरू या त्यांच्या बोकडाची तब्बल सव्वा कोटी रुपये किंमत ठेवली होती. मात्र, बकरी ईदच्या आधीच या बकऱ्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे.

Sheru Goat
थेट विक्रीवरच बोकड बाजाराचे भवितव्य

शरिरावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' नावे

घरची परिस्थिती जेमतेम असलेल्या शकील यांना शेळ्या-बकऱ्या पाळण्याची आवड आहे. दीडवर्षांपूर्वी त्यांच्या एका बकरीला एक पिल्लू झाले. शकील यांनी त्याचे नाव 'शेरू' असे ठेवले. घरची परिस्थिती बेताची असली तरी शेरूचे संगोपन अगदी श्रीमंती थाटात केले. शेरूच्या मानेवर जन्मत: 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' अशी मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र असणारी उर्दू भाषेतील नावे होती.

Sheru Goat
बाजार बंदचा बोकड खरेदी-विक्रीला फटका 

तब्बल सव्वा कोटी किंमत

बकरी ईदसाठी मुस्लिम धर्मामध्ये विशेष बोकडांची मागणी असते. हे लक्षात घेता शकील यांनी शेरूची तब्बल एक कोटी २१ लाख ७८६ रुपयांना विक्री करण्याचे ठरविले होते. या बोकडाच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून शकील यांनी आपल्या गावी शाळा बांधण्याचे आणि रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होती.

सफरचंद, द्राक्षांचा आहार

दरम्यान, शकील यांनी शाही थाटात पालनपोषण केलेल्या शेरूचा आहारही शाही होता. शेरूचा मालक त्याला दररोज सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका हरभरा असा आहार देत असे.

गेल्या काही दिवसांपासून शेरू आजारी पडला होता. याच आजारपणात शेरूचा मृत्यू झाला. मात्र, शेरूसाठी लावलेल्या किमतीमुळे गेल्या काही दिवसात या बकऱ्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com