Fodder Crop Agrowon
काळजी पशुधनाची

Agriculture Technology : हिरव्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्र

Green Fodder : कमी पावसामुळे पिकाची वाढ खुंटल्यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करावे.

Team Agrowon

‘काटेपूर्णा’तून अखेर पाच आवर्तने मिळणारडॉ. अजित पाटील, डॉ. गणेश गादेगावकर

कमी पावसामुळे पिकाची वाढ खुंटल्यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करावे. हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब करून कमी जागा, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेत अत्यंत लुसलुशीत हिरवा पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. चाराटंचाईच्या काळात हा चारा वापरल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

साहित्य

चारा उत्पादन होण्यासाठी कमी खर्चात पॉलिहाउस किंवा शेडनेटमध्ये उत्पादन घेता येते.

चांगली उगवणक्षमता (८० टक्क्यांपेक्षा जास्त) असलेली बियाणे वापरावे.

प्लॅस्टिक ट्रे (३ फूट लांब × २ फूट रुंद × ३ इंच उंची). आपल्याकडील जनावरांच्या संख्येनुसार ट्रेची संख्या ठरवावी.

ट्रे ठेवण्यासाठी लोखंडी, पीव्हीसी पाइप किंवा बांबू रॅकचा वापर करावा.

पाणी फवारण्यासाठी स्प्रे पंप किंवा स्वयंचलित फॉगर, मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करावा.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चारा तयार करण्याची पद्धत

मका, गहू, बार्ली, ओट आणि बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारा निर्मिती करता येते. या पद्धतीद्वारे ज्वारी पिकाची निर्मिती करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.

बियाणे निवडताना बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे. टपोरे दाणे, किमान ८० टक्के उगवणक्षमता, रोगमुक्त व बुरशीमुक्त असावे. तसेच बियाणे कोणतीही बीजप्रक्रिया केलेली नसावे, असे केल्यामुळे जनावरांना होणाऱ्या विषबाधेचा धोका टळू शकतो.

सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन -तीन वेळेस धुऊन घ्यावे. त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी १२ ते २४ तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवावे (एक किलो बियाण्यासाठी दोन लिटर कोमट पाणी वापरावे) त्यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या गोणपटामध्ये गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाण्यात मोड येण्यास मदत होते. गोणपाटावर सकाळ, संध्याकाळ पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे.

मोड येण्यास सुरुवात झाल्यावर बियाण्यांवर ५ टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. त्यामुळे ओलसर वातावरणात वाढणाऱ्या बुरशीची वाढ होत नाही.

प्लॅस्टिकचे ट्रे स्वच्छ पाण्याने धुऊन चांगले वाळवून घ्यावेत. पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य एक किलो प्रति ट्रे याप्रमाणे पसरवून घ्यावे. असे ट्रे शेडमध्ये रॅकवर ठेवावेत.

शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रो स्पिंकलरचा वापर करावा. एका ट्रेला दोन लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसांत चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रेसाठी सुमारे ३० लिटर पाण्याची गरज असते.

अशा पद्धतीने १२ ते १५ दिवसांत २५ ते ३० सेंमी उंचीचा हिरवा चारा तयार होतो.

एक किलो बियाण्यापासून सुमारे १० ते १२ किलो हिरवा पौष्टिक चारा तयार होतो.

चारा देण्याची पद्धत

चारा जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. ट्रेमधून चारा काढायला सोपा जातो. हा चारा जशाचा तसा किंवा तुकडे करून देता येतो.

जनावरांना फक्त हायड्रोपोनिक्स चारा दिसल्यास अपचन, पोटफुगी होण्याची शक्यता असते, म्हणून हा चारा सुक्या चाऱ्यासोबत द्यावा.

दुभत्या जनावरांना दररोज १५ ते २० किलो चारा प्रति दिवस द्यावा. भाकड जनावरांना ६ किलो द्यावा. आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रेचे नियोजन करावे.

तंत्रज्ञानाचे फायदे

दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते.

कमी जागेत, कमी पाण्यात, कमी वेळेत हिरव्या पौष्टिक चाऱ्याची निर्मिती करता येते.

तयार झालेला चारा मुळासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळे बहुतांश पाणी व जास्तीत जास्त अन्नद्रव्ये जनावरांना मिळतात.

चारा अत्यंत लुसलुशीत पौष्टिक व चवदार असतो. त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण भरपूर असते.

वर्षभर अखंडपणे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते.

पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत खूप कमी मनुष्यबळ लागत असल्यामुळे लागवड खर्च खूप कमी होतो.

जनावरांच्या आहारात पशुखाद्य वापरण्याच्या खर्चाचा विचार केला असता त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो. त्यामुळे पशुखांद्यावरील सरासरी २५ ते ३० टक्के खर्च कमी करता येऊ शकतो.

दूध उत्पादनात तसेच फॅटमध्ये देखील वाढ होते.

पारंपरिक चाऱ्याप्रमाणे काढणीपूर्वी आणि साठवणुकीत होणारी नासधूस व पोषण मूल्यांचा अपव्यय होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT