Rabi Irrigation : ‘काटेपूर्णा’तून अखेर पाच आवर्तने मिळणार

Rabi Season : यंदाच्या रब्बी हंगामात काटेपूर्णा प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाच आवर्तने मिळण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या रब्बी हंगामात काटेपूर्णा प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाच आवर्तने मिळण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या आठवड्यात पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांना २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान शेवटचे आवर्तन दिले जाणार आहे.

पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा अपुरा आहे. यामुळे असलेल्या साठ्यातून पिण्याच्या पाण्यासाठीच जास्तीत जास्त नियोजन करण्यात येत आहे. काटेपूर्णा प्रकल्पसुद्धा यंदा ८२ टक्के भरला होता. विविध पाणीपुरवठा योजनांसाठी या प्रकल्पातून पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. त्यामुळे रब्बी सिंचनावर परिणामाची शक्यता वाढली होती.

Rabi Season
Rabi Irrigation : ‘चासकमान’मधून सोडलेले आवर्तन ६३ दिवसानंतरही सुरूच

रब्बीत सिंचनासाठी काटकसरीने पाणी वापर करावा. कमी पाण्यात येणारी पिके घ्यावी यासाठी शेतकऱ्यांना आवाहनही केले गेले. गव्हाऐवजी हरभरा पीक लागवडीबाबत आग्रह धरला जात होता. प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांनी गावागावात बैठका घेत रोष व्यक्त केला.

Rabi Season
Rabi Irrigation : विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी रब्बीसाठी मिळणार

शिवाय ३१ ऑक्टोबरला झालेल्या कालवे समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी रब्बीसाठी गहू, हरभरा या पिकांना पाणी मिळायला हवे. तो आमचा हक्क आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. हे पाहता अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी कालवा समिती बैठकीच्या एक दिवस आधीच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत रब्बीसाठी पुरेसे पाणी दिले जावे याबाबत स्पष्ट सूचना केली होती.

यंदा साडेचार ते पाच हजार हेक्टरचे नियोजन

रब्बीसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाच आवर्तने दिली जाणार आहेत. मंगळवारपर्यंत (ता.७) पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. तर, हंगामासाठी शेवटचे आवर्तन हे २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान सोडण्यात येईल.

एकूण पाच आवर्तनांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जाते. उपलब्ध पाणीसाठ्यावर यंदा साडेचार ते पाच हजार हेक्टरवर रब्बी पेरणी केली जाईल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com