हवामान बदल आणि धोक्यात आलेली शेती व्यवस्था सावरण्यासाठी मातीचे आरोग्य फार महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान अनुकूल शेती करणे म्हणजे मातीची सुपीकता वाढविणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा.how to maintain soil health in sustainable farming: हवामान बदल आणि त्यामुळे वाढत्या नैसर्गिक आपत्तींची वारंवारता यामुळे मातीचा ऱ्हास होत आहे. त्याच बरोबर माती सुपीकता वाढल्यामुळे हवामान बदल अनुकूल शेती करणे सुद्धा शक्य होणार आहे.म्हणजे हवामान बदल आणि धोक्यात आलेली शेती व्यवस्था सावरण्यासाठी मातीचे आरोग्य फार महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान अनुकूल शेती करणे म्हणजे मातीची सुपीकता वाढवणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करणे असे असणार आहे. हे लक्षात घेऊन पीक पद्धती निश्चित केली पाहिजे..शेतीतून चांगले उत्पादन आणि उत्पन्न हवे हा उद्देश समोर ठेऊन त्या पद्धतीची पीक पद्धतींचा स्वीकार करायला हवा. अशा पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा एकल पीक पद्धती असते. कारण एकल पीक पद्धती स्वीकारणे शेती व्यवस्थापन आणि शेतमाल विक्री व्यवस्था अशा दोन्ही बाजूने कमी जिकरीचे असते.मात्र त्याचा विपरीत परिणाम हा जमीन सुपीकतेवर होत असतो. वर्षानुवर्षे एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. ती भरून काढण्यासाठी पुन्हा रासायनिक खतांचा वापर वाढवावा लागतो. त्याचा परिणाम म्हणजे मातीचा ऱ्हास सुरूच राहतो..Soil Health: मातीचे ते मोल किती?.मातीचा ऱ्हास थांबवून तिची सुपीकता वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शाश्वत माती व्यवस्थापन. या अंतर्गत जागतिक अन्न आणि कृषी संस्थेने एकूण दहा उपाययोजना सुचविल्या आहेत.त्यामध्ये मातीची धूप कमी करणे, सेंद्रिय कर्ब वाढविणे, मातीतील पोषकतत्त्वांचा समतोल राखणे, पाणी व्यवस्थापन, बहुविधपीक पद्धती आणि त्या आनुषंगिक जैवविविधता वाढविणे, माती प्रदूषण रोखणे, जमिनी क्षारपड होण्यापासून रोखणे अशा उपाययोजनांच्या एकात्मिक पद्धतीने अंमलबजावणीची आग्रह त्यामध्ये आहे..योग्य पीक पद्धती महत्त्वाचीशाश्वत माती व्यवस्थापन आणि आपल्याकडे अनेक वर्षांच्या प्रयोगातून सिद्ध झालेली कोरडवाहू शेतीची मूलतत्त्वे यांचा एकत्रित विचार केला असता असे लक्षात येते की या सर्व मूलतत्त्वांचा अंगीकार करणे म्हणजेच ‘शाश्वत माती व्यवस्थापन’ करणे.कारण केवळ शाश्वत माती व्यवस्थापन या दृष्टीने शेतजमिनीचे व्यवस्थापन करणे ८२ टक्के कोरडवाहू शेती असणाऱ्या आपल्या देशाला परवडणारे नाही. कारण त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रश्न तयार होतील..Soil Health: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य .कोरडवाहू शेतकऱ्यांची उपजीविका शक्य होईल अशी पीक पद्धती आणि मातीचे शाश्वत व्यवस्थापन शक्य होईल अशी पीक पद्धती, असा स्वतंत्र विचार न करता शेतकऱ्यांची आणि माती सुपीकता वाढवणारी अशी दोन्ही मिळून एकच पीक पद्धतीची शिफारस करणे अगदीच शक्य आहे. कारण आपल्याकडे पीक विविधता खूप आहे. केवळ खरीप हंगामात घेतली जाणारी पिके असा विचार केला तर किमान १२ ते १५ पिके चांगल्या पद्धतीने घेता येतात. .अशा पीक समूहामध्ये तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये आणि इतर काही पिके घेणे सर्व प्रकारची जोखीम (हवामान, बाजारपेठ इ.) कमी करणारे ठरते. त्याचबरोबर ते जैव विविधता वाढवून जमीन सुपीकता वाढण्यास कारणीभूत ठरतात.त्यासाठी एक एकरातून एकाच पिकाचे १० क्विंटल उत्पादन असा उद्देश न ठेवता, एका एकरातून पाच प्रकारच्या पिकांचे दहा क्विंटल उत्पादन असा उद्देश ठेऊन निश्चित केलेली पीक पद्धती ही माती सुपीकता, जोखीम कमी करणे, अन्न आणि पोषण सुरक्षा अशा सर्वच बाबतीत अगदी योग्य ठरणारी असणार आहे..Soil Health: मृदास्वास्थ्याला हवे सर्वोच्च प्राधान्य.परंतु अशी पीक पद्धती शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य ठरण्यासाठी त्याला धोरणात्मक पाठबळ आवश्यक आहे. सध्या एकल (monoculture) पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल का असतो? असा प्रश्न करून उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कारण त्या पिकाच्या अनुषंगाने एक इकोसिस्टिम तयार झालेली असते. त्यासाठी आवश्यक असणारे इनपुट, कुशल मनुष्यबळ आणि बाजार व्यवस्था हे सर्व सहज उपलब्ध होते. .त्यामुळे एकल पीक घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य ठरते. परंतु शेती, विज्ञान आणि जमिनीची सुपीकता किंवा एकंदरीतच नैसर्गिक संसाधन सुरक्षितता यांचा विचार करता अशा पद्धतीची एकल पीक पद्धती ही योग्य ठरत नाही.उलट ती पीक पद्धती काही काळानंतर पीक संरक्षण, पीक पोषण या अनुषंगाने अनेक समस्या निर्माण करते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत राहतो. त्याच वेळी त्या इनपुट वरील सबसिडीचा खर्च सुद्धा वाढतोच..दुसऱ्या बाजूला शाश्वत शेती तंत्रज्ञान हे सर्व बाजूंनी विचार करता आवश्यक आणि अपरिहार्य सुद्धा आहे. तरीही शेतकऱ्यांच्या तातडीच्या अपेक्षा आणि शाश्वत शेती पद्धती यामध्ये मोठा गॅप दिसतो.कारण शेतकऱ्यांची अपेक्षा ही त्याला चार पैसे मिळावे अशी असते आणि ते सुद्धा तातडीने! या सर्व मुद्यांचा समग्र विचार करून मातीचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशी सांगड घालून धोरण ठरविता येईल. त्यासाठी अनेक योजना सुद्धा तयार करणे शक्य आहे. .त्याची सुरुवात ही किमान सहा पिके आणि त्यापैकी किमान दोन ही डाळवर्गीय असावीत, एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत पशुपालन असावे हे सर्व निकष पूर्ण करणारे ‘शेतकरी ते लाडके’ असे म्हणून त्यांना थेट अनुदान द्यावे.त्यासाठी एक निकष सेंद्रिय कर्ब यातील वाढ असा सुद्धा ठेवता येईल. हे केवळ कल्पना नाही तर अगदीच शक्य सुद्धा आहे. मात्र त्यासाठी अन्नसुरक्षेबरोबर पोषण सुरक्षा आणि त्यासाठी मातीचे शाश्वत व्यवस्थापन असा उद्देश ठेऊन मिशन स्वरूपात एखादी योजना तयार करावी लागेल.: ८८०५२९२०१०(लेखक शाश्वत शेती विकास मिशन, एम.के.सी.एल. नॉलेज फाउंडेशनचे मुख्य सल्लागार आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.