Junnar Gold Mango: ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याला ‘शेतकरी वाण’ म्हणून मान्यता
Mango Variety: जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या आंबा वाणाला केंद्र सरकारकडून अधिकृत ‘शेतकरी वाण’ म्हणून मान्यता मिळाली आहे. दिल्ली येथील PPV&FRA संस्थेकडून वाण नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, हा मान तालुक्याच्या कृषी वैभवात आणखी भर घालणारा ठरला आहे.