Mumbai News : शेतीसाठी नैसर्गिक खत मिळावे या उद्देशाने पशुपालन केले जाते, परंतु आता कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसायदेखील स्वयंरोजगाराची चांगली संधी देत आहेत. युवा शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल आहे, परंतु पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे दर स्थिर असल्यामुळे व्यवस्थापनाच्या तुलनेत खर्च निघत नसल्याने जनावरे सांभाळणे कठीण होत आहेत. त्यामुळे पशुपालक मेटाकुटीला आला आहे.
जव्हार तालुक्यात मका पीक होत नसल्याने बाहेरून मागवण्यात येतो. त्यातच यंदा त्या मका पीक घेतल्या जाणाऱ्या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यातच उभ्या पिकात लष्करी अळी शिरल्याने शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे जनावराच्या वैरणीच्या हिरव्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. जास्तीचे पैसे देऊनही चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुभती जनावरे सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते; तर काही शेतकरी जनावरे कवडीमोल दराने विकत आहेत. शिवाय, चाऱ्याचे दरही वाढत आहेत; मात्र गायी व म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये कोणतीही वाढ होत नाही. त्यामुळे दुग्धउत्पादक, शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
दिवसभरात एका दुभत्या जनावराला तीन वेळेला पोटभर चारा लागतो. कोरडी व हिरवी वैरण, सरकी पेंड, तसेच देखभालीसाठी माणसाचा खर्च दिवसाला पाचशे रुपयांपर्यंत येतो; मात्र एखादी गाय आठ लिटर दूध देत असेल तर त्यातून ४५० ते ४८० रुपये उत्पन्न मिळते. उर्वरित खर्च शेतकऱ्याला खिशातून करावा लागतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.