Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Dairy Business : पशुपालनात उत्पादन खर्च नियंत्रित राखण्यावर भर

Dairy Production : कोल्हापूर जिल्ह्यातील पुनाळ (ता. पन्हाळा) येथील प्रदीप गायकवाड यांनी कुशल व्यवस्थापनाच्या आधारे दुग्ध व्यवसाय यशस्वी केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Farmer Management

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : प्रदीप गायकवाड

गाव : पुनाळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

मुऱ्हा म्हशी : १२,  

एचएफ गाई : ७ गायी  

वासरे : ६

कोल्हापूर जिल्ह्यातील पुनाळ (ता. पन्हाळा) येथील प्रदीप गायकवाड यांनी कुशल व्यवस्थापनाच्या आधारे दुग्ध व्यवसाय यशस्वी केला आहे. गोठ्यातच जातिवंत जनावरांच्या पैदाशीला प्राधान्य देत त्यांची संख्या हळूहळू वाढविली. चारा, खाद्याचे योग्य नियोजन व कुटुंबातील सदस्यांची मदत यामुळेच व्यवसायातील आर्थिक गणित उत्तम प्रकारे सांभाळणे शक्य झाल्याचे प्रदीप गायकवाड सांगतात.

प्रदीप यांची दहा एकर शेती असून, त्यात आठ एकर ऊस, तर दोन एकरांत चारा पिकांची लागवड आहे. लहानपणापासूनच पशुधनाची आवड असल्याने पदवीनंतर प्रदीप यांनी दुग्ध व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. उत्‍कृष्ट दुग्‍धोत्पादनासाठी जिल्‍हा परिषद व दूध संघाकडून प्रदीप यांचा पुरस्कार देण्यात आले आहेत. उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. प्रदीप यांच्या पत्नी सौ. नीलम यांच्यासह कुटुंबातील सदस्य दुग्धव्यवसायात मदत करतात.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

सध्या गोठ्यात मुऱ्हा जातीच्या १२ म्हशी, ७ एचएफ गायी, तर सहा वासरे आहेत.

गोठ्यात प्रति दिन १२ ते १४ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी, तर २६ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत.

पशुधनासाठी ७५ बाय ५० फूट आकाराच्या गोठ्याची उभारणी केली आहे.

गोठ्यात मुक्त पद्धतीचीही सुविधा. एका भागात म्हशी, दुसऱ्या भागात गायी, तर तिसऱ्या भागात वासरे असे विभाग केले आहेत. त्यामुळे प्रत्येक पशुधनावर बारकाईने लक्ष दिले जाते.

जनावरांना विविध आजारांसाठी नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जातो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाली आहे.

लहान वासरे, नुकतीच व्यायलेली गाय, म्हैस, दुभती व भाकड जनावरे असे वर्गीकरण करून त्यानुसार खाद्य दिले जाते. आहारात गोळी पेंड, हरभरा भुस्सा, सरकी पेंड, मका चुनी, गहू भुस्सा आदींचा समावेश असतो.

खाद्य नियोजन

पशुपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी पाणी, चारा, आहार आणि आरोग्य यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन ठेवले जाते.

जनावरांना संतुलित चारा मिळावा यासाठी विविध प्रकाराच्या चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात मक्यासह ज्वारीचे प्रथिनयुक्त सुधारित वाण, नेपिअर गवत आदींची लागवड करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामात कडबा कुट्टीचे संकलन करून पावसाळ्यासाठी तजवीज केली जाते.

जनावरांना दूध देण्याची क्षमता, वय आदी बाबींचा विचार करून सुक्या आणि ओल्या चाऱ्यासह मुरघासही दिला जातो.

टंचाई काळात दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी मुरघासचा प्रभावी वापर केला जातो. कोरडा चारा व मुरघास यांचा वापर करून सकस आहार देण्याचे नियोजन असते.

दूध उत्पादन

दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो. उत्पादित सर्व दूध संघास दिले जाते. दर महिन्याला खर्च वजाजाता ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो, असे प्रदीपराव सांगतात.

गोठ्यातच पैदाशीवर भर

अन्य राज्यांतून जनावरे आणून त्यांचे व्यवस्थापन करणे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. हा अनुभव लक्षात घेऊन गोठ्यातच जातिवंत जनावरांची पैदास करण्यावर प्रदीप यांनी भर दिला आहे. पैदाशीसाठी विविध कंपन्या, दूध संघांकडील वीर्यमात्रा यांचा अभ्यास करून कृत्रिम रेतनाचा वापर केला जातो. जनावराचे वय, वेतांची संख्या, औषधोपचार, गाभण तारीख आदी सर्व तपशिलांची नोंद ठेवली आहे.

प्रदीप गायकवाड, ९७६७१३६७७३

(शब्दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT