Akola News : गेल्या काही तासांपासून पश्चिम विदर्भात पावसाने जोर धरला असून मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांतील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात पावसाने ठाण मांडले आहे..मागील २४ तासात अकोला जिल्हयात चोहोट्टा मंडलात ६३.८ मिमी, कुटासा ५८.८ मिमी, अकोला ६६.८ मिमी, घुसर ८२.८ मिमी, दहिहांडा ९९.८ मिमी, बोरगावमंजू ८२.८ मिमी, पळसो बढे ९८.५ मिमी, सांगळूद ८२.८ मिमी, कुरणखेड ९०.३ मिमी, निंबा १२६.३ मिमी, माना ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे..Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार .तर बुलडाणा जिल्हयात पाडळी १२६.८ मिमी, देऊळघाट १२६.८ मिमी, शेलगाव ७० मिमी, मेहकर ६७.३ मिमी, डोणगाव ८३.३ मिमी, देऊळगाव ७२ मिमी, टिटवी ९०.८ मिमी, सुलतानपूर ६५.५ मिमी, अंजनी ७१.३ मिमी पाऊस पडला.या जोरदार पावसाने शेतशिवारात पाणी साचले. अकोला तालुक्यात खारपाणपट्ट्यात शनिवारी (ता. १६) रात्री अनेक गावात जोरदार पाऊस पडल्याने काही ठिकाणी नागरिकांच्या घरांतही पाणी शिरले..Heavy Rain Maharashtra : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.यामुळे अन्नधान्य भिजले. या जोरदार पावसाने पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रस्ते वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. अकोल्यातील बहुतांश नद्यांना जोरदार पूर वाहू लागले आहेत.काटेपूर्णा धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने मोठी आवक होत आहे. परिणामी शनिवारी (ता.१६) मध्यरात्री दोन वक्रद्वारे उघडून नदी पात्रात विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली..रिसोड तालुक्यात धुमशानपाऊस गेले दोन दिवस वाशीम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव तालुक्यात जोरदार बरसत आहे. प्रामुख्याने रिसोड तालुक्यातील शेती व पिकांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. शेलू खडसे, लोणी या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला..पावसाची नोंद (२४ तास)अकोला जिल्हानिंबा १२६.३ मिमीदहिहांडा ९९.८ मिमीपळसो बढे ९८.५ मिमीकुरणखेड ९०.३ मिमीबोरगावमंजू / घुसर / सांगळूद प्रत्येकी८२.८ मिमीबुलडाणा जिल्हापाडळी /देऊळघाट प्रत्येकी१२६.८ मिमीटिटवी ९०.८ मिमीडोणगाव ८३.३ मिमीशेलगाव ७० मिमीखुदनापूर परिसरात रोजच पाऊस सुरू आहे. पिके पिवळी पडायला लागली. शेतात अंतर्गत मशागत करता येत नाही. पिकाच्या वर तण गेले आहे. बहुतांश ठिकाणी खोलगट भागातील तुरी नष्ट झाल्या असून बाकी ठिकाणी तण वाढले आहे. त्यामुळे निश्चितच उत्पादन कमी येणार आहे.- निंबाजी लखाडे, शेतकरी, खुदनापूर, जि. बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.