Atmanirbhar Bharat: भविष्यात देशाच्या राजकारणात काही तरी मोठे आणि अकल्पित घडेल, असे स्वप्नरंजन करणाऱ्यांना खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून खाद्य पुरवले आहे. त्यांचे लाल किल्ल्यावरील प्रदीर्घ भाषण आत्मनिर्भरतेचा पुरस्कार करणारे आणि संरक्षणविषयक आव्हानांचा परामर्श घेणारे होते.