Agriculture Tips: हवामान अंदाज मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, कोकण विभागामध्ये आज (ता. १८ ऑगस्ट) तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात १८ ते २३ ऑगस्ट या दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधीदरम्यान कमाल आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. .विशेष सल्लाभात, नागली, आंबा, काजू, सुपारी, नारळ, हळद आणि भाजीपाला पिके असलेल्या शेतामध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पाण्याचा निचरा करून घ्यावा.सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश सर्व पिकांतील कीड रोगनियंत्रणासाठीच्या फवारणी आणि खते देण्याची कामे पुढे ढकलावीत..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).खरीप भातफुटवे अवस्थाभात पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी ठेवावी. बांधितील अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.खाचरातील बांधांची बांधबंदिस्ती करावी. बांध तणमुक्त ठेवावेत..नागली, वरीपुनर्लागवडरोपे लावणीस तयार झाल्यानंतर लावणीच्या एक दोन दिवस अगोदर रोपवाटिकेतील वाफ्यांना भरपूर पाणी द्यावे. रोपे उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पादन मिळण्यासाठी ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन या प्रमाणे दोन ओळींत २० सें.मी. आणि दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. ही लागवड पावसाची तीव्रता कमी असताना मुसळधार पावसाचा जोर ओसरल्यानंतर लावावीत.नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट व चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी २५ सें.मी. × १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.नागली पिकामध्ये काही ठिकाणी गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असे झाल्यास गोगलगाय वेचून नष्ट कराव्यात किंवा वेचून युरियाच्या द्रावणात बुडवून नष्ट कराव्यात..Crop Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग).नारळफुलोरा ते फळधारणाबागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.नवीन लागवड केलेल्या रोपांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी..आंबानव्या लागवडीच्या रोपांना काठीचा आधार द्यावा.मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आंबा बागेतील वाढनियंत्रकांच्या मात्रा (पॅक्लोब्युट्रॉझॉल) देण्याचे काम पुढील सल्ला मिळेपर्यंत पुढे ढकलावे.डॉ. वीरेश चव्हाण (नोडल अधिकारी), ९४२२०६५३४४कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.