Goat Farming : Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : पोषण व्यवस्थापनातून शेळीपालनात उत्पन्नवाढ शक्य

Goat Feed Management : विशेषतः शेळीपालन आणि पर्यटनाचा योग्य समन्वय साधल्यास आदिवासी भागात नवे रोजगारनिर्मितीचे साधन उपलब्ध होऊ शकते.

Team Agrowon

Ahilyanagar News : ‘‘अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाने व्यावसायिक शेळीपालनाचा स्वीकार करावा. विशेषतः शेळीपालन आणि पर्यटनाचा योग्य समन्वय साधल्यास आदिवासी भागात नवे रोजगारनिर्मितीचे साधन उपलब्ध होऊ शकते. शेळ्यांच्या आरोग्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पोषण व्यवस्थापनाचा वापर केल्यास उत्पन्नवाढ होऊ शकते,’’ असे मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू), राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती उपघटक योजनेअंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय (शिरवळ, जि. सातारा) आणि पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद आणि शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमास आमदार डॉ. किरण लहामटे आणि राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुखदेव बारबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘माफसू’चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने होते.

या वेळी ‘माफसू’चे कार्यकारिणी सदस्य हृषीकेश खांदे पाटील, डॉ. विकास वासकर (सहयोगी अधिष्ठाता), डॉ. सुनील तुंबारे (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त), डॉ. दशरथ दिघे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), डॉ. बसवा रेड्डी (प्रमुख शास्त्रज्ञ), डॉ. योगेश गाडेकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ), डॉ. गोकूळ सोनवणे (कार्यक्रम समन्वयक), डॉ. चंद्रशेखर मोटे, डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. तेजस शेंडे, डॉ.अतुल पाटणे (साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन), डॉ.अशोक धिंदळे (पशुधन विकास अधिकारी विस्तार) हे उपस्थित होते.

डॉ. बारबुद्धे म्हणाले, की शेळीपालनामध्ये चांगल्या प्रतीच्या बोकडांची पैदास आवश्यक आहे. मूल्यवर्धित मांसल पदार्थ निर्मिती केल्यास आर्थिक फायदा वाढविण्याची चांगली संधी आहे. यासाठी राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

डॉ. भिकाने म्हणाले, की शेळीपालनातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. सशक्त पैदास, करडांचे जन्मतःचे अधिक वजन मिळण्यासाठी गाभण शेळ्यांना पशुखाद्य देणे, करडातील मरतूक कमी करणे, करडांची वाढ वेगाने होण्यासाठी योग्य आहार व्यवस्थापन करावे.

शेळीचे दूध आणि लेंडीखत हा उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संयोजक डॉ.वासकर यांनी स्वागत, डॉ. तेजस शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोकूळ सोनवणे यांनी प्रास्ताविक आणि डॉ.चंद्रशेखर मोटे यांनी आभार प्रदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT