Agricultural Planning Issue: जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र, रोहिणी नक्षत्रातील एक दिवसाच्या पावसानंतर मृग नक्षत्रात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत..कवी र.वा. दिघे यांच्या या काव्यपंक्ती सध्या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळिराजाला बसला आहे. रोहिणी नक्षत्रात तालुक्यातील काही भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी लागवडही केली; मात्र त्यानंतर पावसाची एकही सर कोसळली नाही. त्यामुळे लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे..Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह.सध्या ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तरीही सुमारे ९० टक्के शेतजमिनीची मशागत करून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी पूर्ण ठेवली आहे. वारा सुटला किंवा आभाळ दाटून आले की शेतकऱ्यांच्या आशा उंचावतात; मात्र पावसाने पाठ फिरवल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे..Monsoon Delay Issue: काही भागांत पावसाचे मोठे खंड.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे व खतांची खरेदी केली आहे. मात्र, पाऊस लांबल्याने सर्वांचेच डोळे आभाळाकडे लागले आहेत. जाफराबाद तालुक्यात अद्याप सार्वत्रिक पेरण्यांना सुरवात झालेली नाही. केवळ सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प परिसरातील कुंभारझरी, खानापूर, निमखेडा, आळंद आदी भागांत काही प्रमाणात लागवड झाली आहे..मूग, उडदाचा पेरा घटण्याची शक्यतामृग नक्षत्रात पाऊस न झाल्याने मूग व उडीद पिकांच्या पेरणीचा पारंपरिक कालावधी कमी होत चालला आहे. त्यामुळे यंदा या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. परिणामी आगामी काळात मूग व उडिदाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. या पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील अनेक शेतकरी यंदा सोयाबीन लागवडीकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.