Goat Farming: शेळ्यांतील आनुवंशिक सुधारणेसाठी निवड आणि प्रजनन

Dairy Business: शेळीपालन व्यवसायात अधिक नफा मिळवायचा असेल, तर योग्य शेळी व बोकडाची निवड आणि प्रजनन धोरण गरजेचे आहे. आनुवंशिक सुधारणेमुळे शेळ्यांच्या उत्पादनक्षमतेत मोठी वाढ करता येते.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. शरद आव्हाड

Goat Breeding: पशुधनात आनुवंशिक सुधारणा करायची असल्यास पशुपालकाकडील दोन महत्त्वाची साधने म्हणजे पशू निवड आणि प्रजनन. आपल्याला शेळी, बोकडाची बाह्य गुणांसाठी निवड कशी करावी या विषयी माहिती असते. मात्र आनुवंशिक सुधारणेसाठी निवड कशी करायची आणि प्रजनन व्यवस्थापन कसे करायचे याबाबत तांत्रिक माहिती असणे महत्त्वाचे आहे.

आ नुवंशिक सुधारणा म्हणजे जातिवंत जनावरांनी उत्कृष्ट अशी पुढची पिढी निर्माण करणे. शेळी आणि बोकड यांच्यामध्ये चांगले उत्पादनक्षम गुणधर्म असतील तर त्यांची करडे देखील उत्तम असतात. अधिक दर्जेदार उत्पादन पशुपालनातून मिळवायचे असेल तर पशुपालकाला विविध पातळ्यांवर नियोजन व सुधारणा कराव्या लागतात. यामध्ये प्रामुख्याने पोषण, व्यवस्थापन, अनुवंश, आरोग्य आदी बाबींचा समावेश होतो.

या बाबी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या तरी आनुवंशिक सुधारणा ही सुजाण पशुपालकाच्यादृष्टीने महत्त्वाची ठरते. त्याचे कारण असे आहे की, आहार, आरोग्य आणि व्यवस्थापनामुळे होणारी वृद्धी ही फक्त पहिल्या पिढी पुरती मर्यादित असते, पण आनुवंशिक व्यवस्थापन केल्यास पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवू शकतो. कारण ही सुधारणा जनुकीय पातळीवर घडवून आणली जाते.

पशुधनात आनुवंशिक सुधारणा करायची असल्यास पशुपालकाकडील दोन महत्त्वाची साधने म्हणजे पशू निवड आणि प्रजनन. आपल्याला शेळी, बोकडाची बाह्य गुणांसाठी निवड कशी करावी या विषयी माहिती असते. पण पशूंच्या आनुवंशिक सुधारणेसाठी निवड कशी करायची आणि प्रजनन व्यवस्थापन कसे करायचे, याबाबत तांत्रिक माहिती महत्त्वाची ठरते. पुढच्या पिढीला जन्म देणाऱ्या जातिवंत नर व मादीची निवड महत्त्वाची बाब आहे.

Dairy Business
Goat Farming : शेळीपालनाची अर्धबंदिस्त पद्धत किती फायद्याची?

निवड करण्याचे उद्दिष्ट

निवडीचे अनेक निकष असू शकतात जसे की, शारीरिक गुणधर्मासाठी निवड, मांस उत्पादनासाठी निवड, दूध उत्पादनासाठी निवड, जुळे-तिळे देण्याच्या क्षमतेसाठी निवड किंवा एका वर्षात अधिक वेत देण्याच्या क्षमतेसाठी निवड.

आनुवंशिक सुधारणा करताना त्यासाठीचे उद्दिष्ट ठरवणे सर्वात महत्त्वाचे आहे. पशुधनातील प्रजनन गुणधर्म जाती निहाय, क्षेत्रनिहाय बदलतात. जमनापारी शेळीत दूध उत्पादन गुणधर्म आहे तर उस्मानाबादी शेळी जुळे-तिळे देण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. आनुवंशिक सुधारणा उस्मानाबादी शेळीमध्ये करत असताना याच गुणधर्मावर लक्ष केंद्रित ठेवणे आवश्यक आहे.

पशुधनातील उत्पादन गुणधर्म अनेक जनुकांनी नियंत्रित केली जातात. त्यांची हेरिटेबिलिटी कमी असते. हेरिटेबिलिटी म्हणजे एकूण शेळ्यांमध्ये आनुवंशिक घटकांमुळे एखाद्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये होणारा फरक. शेळीचा प्रजनन गुण यामध्ये आनुवंशिकतेमुळे ५-२० टक्के आणि वातावरणामुळे ८५-१०० टक्के फरक पडतो म्हणजे हेरिटेबिलिटी खूप कमी आहे म्हणूनच या गुणधर्मांमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य नियोजन फार महत्त्वाचे आहे.

वरील नमूद केलेले सर्व निकष एकमेकांशी निगडित असल्याचे लक्षात येते. ४) जसे शारीरिक गुणधर्म उत्कृष्ट असलेल्या शेळीचे मांस उत्पादन आपसूकच उत्तम असते. पण निवड प्रक्रिया करताना शारीरिक गुणधर्म, मांस उत्पादन, जुळे-तिळे देण्याची क्षमता व मातृ क्षमता या सर्वच पातळीवर उत्कृष्ट असलेल्या शेळी/बोकड यांची निवड आपण करायची आहे.

Dairy Business
Goat Market : अखेर मुरूडचा शेळीमेंढी बाजार पूर्ववत

नोंदणी

जे तुम्ही मोजू शकत नाही, त्याचे व्यवस्थापन करू शकत नाही, म्हणूनच मोजमाप असणे फार महत्त्वाचे आहे. प्रक्षेत्रावरील सर्व नोंद वह्या अद्ययावत ठेवाव्यात. जरी सर्व जनावरांची सूची ठेवणे शक्य झाले नाही तरी कळपातील उत्तम दर्जाच्या पशुधनाच्या नोंदी अवश्य ठेवाव्यात. नराच्या संततींच्या नोंदी अवश्य ठेवाव्यात.

निवड पद्धत

प्रौढ शेळ्यांची निवड आपण त्यांच्या उत्पादन नोंदींच्या मदतीने करू शकतो, यालाच वैयक्तिक निवड असे म्हणतात. करडांची निवड करण्यासाठी त्याच्या मातेच्या नोंदी आणि उत्पादन क्षमतेची सूची लक्षात घेता येईल. याला वंशावळ निवड पद्धत असे म्हणतात.

२० नर निवडण्यासाठी सुद्धा याच पद्धतीचा वापर केला जातो. संतती निवड पद्धतीमध्ये बोकडाची निवड त्याच्यापासून जन्मलेल्या मादी करडांच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे केली जाते. संतती निवड पद्धत नर निवडण्यासाठीची सर्वांत विश्‍वसनीय पद्धत आहे.

नराची निवड

कुठल्याही कळपामध्ये जातिवंत नर कमी असतात (लिंग गुणोत्तर १:३०) आणि म्हणूनच एका पिढीच्या प्रजननानंतर कळपामध्ये नर जनुके, नर गुणधर्म अधिक वाढतात. म्हणूनच आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी नर हा नेहमी केंद्र स्थानी असतो. उत्कृष्ट प्रतीचा नर आपल्या कळपामध्ये घातांकीय आनुवंशिक बदल घडवून आणू शकतो.

शेळीपालनातील प्रजनन धोरण

शेळ्यांचे प्रजनन करताना मांस उत्पादनाप्रमाणेच दूध उत्पादनावर भर द्यावा.

पर्जन्य प्रदेशात टिकतील अशा शेळ्यांची निवड करून प्रजनन करावे, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. या धोरणाप्रमाणे शेळ्यांच्या चार प्रजाती (उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याळ, बेरारी) ज्या ठिकाणी आढळतात तिथे जातिवंत शेळ्यांची निवड करून त्यांना प्रजननासाठी वापरावे असे सुचवले आहे. तसेच या परिसरातील इतर गावठी शेळ्यांचे या चार प्रजातींच्या शेळ्यांबरोबर प्रजनन करावे असे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मांस उत्पादन व दुग्ध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विदेशी जातीच्या शेळ्यांसोबत संकर करण्याचे सुचवले असले, तरी शेळीपालनामध्ये प्रमुख प्राधान्य निवड पद्धतीने प्रजनन आणि गावठी शेळ्यांचे महत्त्वाच्या स्थानिक जातींसोबत प्रजनन करावे, यास प्राधान्य दिले आहे.

शेळ्यांमधील कृत्रिम रेतन करण्याची आवश्यकता व्यक्त केली असली तरी ताजे वीर्य वापरून रेतन करण्याचे तंत्र वापरण्यास प्राधान्य दिले आहे.

प्रजनन धोरणानुसार पर्जन्य प्रदेशात चांगले उत्पादन करून जुळे व तिळे करडे देऊ शकणाऱ्या शेळ्यांची राष्ट्रीय पातळीवर नोंदणी करावी. अशा वंशावळीतील बोकडाचा वापर प्रजननासाठी करावा असे सुचवले आहे.

राज्यातील पशुवैद्यक आणि कृषी विद्यापीठांनी न्यूक्लियस प्रजनन प्रणालीचा वापर करून उत्कृष्ट जातीच्या कळपाची निर्मिती करणे आवश्यक आहे. तसेच पशुपालकांनी स्वकुळातील रेतनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गट प्रजनन प्रणालीचा वापर करावा असे सुचवले आहे.

डॉ. प्राजक्ता जाधव, ९८१९६६४७५१

(सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com