Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : पशुधनांची काळजी घेऊन रोगांचा प्रादुर्भाव टाळा

Animal Disease : पावसाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे विविध रोगजंतूची झपाट्याने वाढ होते. परिणामी पशुधनास द्यावयाचा चारा, खाद्य, पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे विविध रोगजंतूची झपाट्याने वाढ होते. परिणामी पशुधनास द्यावयाचा चारा, खाद्य, पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुधनास विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले.

किफायतशीर पशुपालनासाठी पशुधनाचे आरोग्य, त्यांची उत्पादन क्षमता वृद्धिंगत करणे, त्यांना द्यावयाचा चारा, पशुखाद्य, त्यांचे व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. पशूंच्या त्वचेवर गोचिड, गोमाशा, पिसवा, उवा इ. बाह्यपरोपजीवी असल्यास त्यांच्यामार्फत पशुधनास विविध रोगांचा प्रसार होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होते.

काही प्रसंगी पशुधन दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाह्यपरोपजीवींचे नाश करणाऱ्या औषधींची फवारणी गोठा, पशुधन व परिसरात करण्यात यावी.

गव्हाण, गोठा यांची काळजी घ्यावी

- पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्याचे छत, जमीन यांची दुरुस्ती करावी. यामुळे गोठ्यात पाणी गळणार नाही व साठून राहणार नाही.

- पशुधनाचा गोठा कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. जमिनीचा ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की शिंपडावी.

- पशूंना पशुखाद्य, वाळलेला चारा, हिरवा चारा देण्यासाठी गव्हाणीचा वापर केला जातो. या गव्हाणी स्वच्छ व कोरड्या असणे गरजेचे आहे. गव्हाण ओली असल्यास त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते व ही बुरशी खाद्यामधून पशुधनाच्या शरीरात गेल्यास पशूंना विषबाधा होण्याची शक्यता असते.

- गोठ्यातील जमीन, गव्हाण व भिंतीमध्ये भेगा असल्यास अशा भेंगामध्ये बाह्यपरोपजीवी अंडी घालतात. ही अंडी नष्ट करण्याकरिता तिथे फ्लेम गनचा वापर करून ती जाळण्यात यावीत.

पिण्याच्या पाण्याचा हौद

पशुधनास पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने, पाण्याच्या हौदाची नियमितपणे स्वच्छता करणे, निर्जंतुकीकरण करणे त्यामध्ये शेवाळ होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

गोठ्यालगतचा परिसर

- पावसाचे पाणी गोठ्यालगतच्या परिसरात साचल्याने त्यावर डास अंडी घालतात व त्यापासून डासांची उत्पत्ती होते. डासांपासून पशुधनास रोग प्रार्दुभाव संक्रमित होण्याची शक्यता असल्याने, साचलेल्या पाण्यास चर काढून पाण्याचा निचरा होईल, असे पाहावे.

- शेण व लेंड्यांच्या विल्हेवाटीसाठी शेणखत खड्डा तयार करावा. खड्डा गोठ्यापासून दूर अंतरावर राहील याची दक्षता घेण्यात यावी.

- पशूंचे मूत्र साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पशुधन मूत्रविसर्जन केल्यानंतर त्वरित वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा शोषखड्डा तयार करण्यात यावा.

विषबाधेबाबत दक्षता घ्यावी

मुरमास व पशुखाद्य भिजलेला असल्यास, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊन पशुधनास विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या पाण्याने वा इतर कारणाने चारा व मुरघास भिजणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी वाळलेला चारा, मुरघास व पशुखाद्य कोरड्या व स्वच्छ ठिकाणी साठविण्यात यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT