Rural Development
Rural Development Agrowon
ॲग्रो गाईड

Rural Development : ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी कशी उभारली लोकचळवळ

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

नव्वदच्या दशकात लातूर जिल्ह्यातील (Latur District) देवणी तालुक्‍यातील विजयनगर या छोट्याशा गावचा तरूण करिअर घडविण्यासाठी म्हणून मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये आला. इथं आल्यानंतर त्याने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची उर्मी मनात असलेल्या तो युवक १९९३ मध्ये पुण्यातील 'सोस्वा' या स्वयंसेवी संस्थेने (Soswa Organisation) औरंगाबादेत आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झाला.

या कार्यशाळेतून त्याला समाजकार्यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचा मार्ग मिळाला. अन्‌ त्याच क्षणी पुढचा कसलाही विचार न करता जगण्यासाठी सुरू असलेली मार्केटिंगसह इतर सारी कामं त्या युवकाने क्षणात सोडून दिली. तो युवक म्हणजे ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे.

जीवनकार्याची दिशा सापडली, परंतु पुढं जायचं कसं हा गुंता सुटत नव्हता. शिवपूरे यांनी स्वयंसेवी चळवळीत काम करत असलेल्या भा. दो. पाटील यांची भेट घेतली. हा मुलगा धडपडतोय, समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची तडफ त्याच्या अंगी आहे, हे हेरून पाटील यांनी शिवपूरे यांची ओळख साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांच्याशी करून दिली. भांड 'लोकशिक्षण' ही स्वयंसेवी संस्था स्थापन करून सामाजिक काम करत होते. शिवपूरे यांनी त्यांच्यासोबत काम सुरू केले. तिथला अनुभव त्यांच्यासाठी खूपच दिशादर्शक ठरला.

शिवपूरे यांनी मग १९९८ मध्ये औरंगाबाद येथेच 'लोकसहभागाद्‌वारे शाश्वत ग्रामीण विकास' असं ब्रीद घेवून 'ग्रामविकास' संस्थेची स्थापना केली. गावाच्या सर्वांगीण विकासात पाण्याचे महत्त्व कळीचे आहे, हे ओळखून ग्रामविकास संस्थेचे काम सुरू झाले. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, आदर्श गाव योजना, जागतिक बॅंकेचा देशातील पथदर्शी जलधर आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्प, जलस्वराज्य, आपलं पाणी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, व्हीएसटीएफ, शिवकालीन पाणी साठवण योजना, आपला विकास आपल्या हाती आदी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून संस्थेचं काम गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे.

संस्थेची पायाभरणी

ग्रामविकास संस्थेने पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, खुल्ताबाद या चार तालुक्‍यांतील दहा गावांत गायत्री पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबविला. या प्रकल्पातून कंपार्टमेंट बंडींग, सिमेंट बांध, शेततळे, छोटे मातीबांध अशी कामे केली. या कामांमुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांना पिकपध्दतीत बदल करून उत्पन्न वाढविणे शक्‍य झाले. महिला बचत गट, पाणलोट, चेतना केंद्र, क्षमता बांधणी, प्रशिक्षण, फळबाग लागवड, शेतीमध्ये तंत्रज्ञान वापराविषयी जागृती आदी उपक्रमही संस्थेने राबविले. त्यानंतर संस्थेनं मागं वळून पाहिलं नाही. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून संस्थेचं काम जोरात सुरू झालं.

ग्रामविकास संस्थेनं २००३ ते २०१० या काळात पैठण तालुक्‍यातील ववा गावात 'आपला विकास आपल्या हाती' हा प्रकल्प राबवला. त्यानंतर २०११ ते २०१५ दरम्यान याच गावात आदर्श गाव प्रकल्प राबवला. ग्रामविकास संस्थेला खरी ओळख मिळाली ती औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाने...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT