Fruit Crop Insurance : रावेरात फळ पीकविमा परताव्यापासून शेतकरी वंचित

रावेर तालुक्यातील सुमारे आठशे केळी उत्पादकांचे केळी पीक विमा योजनेतील परतावे किंवा रक्कम विविध कारणांनी विमा कंपनीकडे अडकून पडले आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

जळगाव : रावेर तालुक्यातील सुमारे आठशे केळी उत्पादकांचे (Banana Farmer) केळी पीक विमा योजनेतील (Banana Crop Insurance) परतावे किंवा रक्कम विविध कारणांनी विमा कंपनीकडे (Crop Insurance Company) अडकून पडले आहेत. परतावे दिवाळीपूर्वी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच याबाबत तालुका प्रशासनास निवेदनही देण्यात आले.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : विनयकुमार आवटे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे केळीपीक विमा योजनेत मंजूर रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांची बैठक रावेरात नुकतीच झाली. शेतकऱ्यांनी निधी का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच तहसील कार्यालयात सर्व शेतकऱ्यांनी जाऊन नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले.

Crop Insurance
Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

अन्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची भरपाई रक्कम मिळून २५ दिवस उलटले तरी देखील या ८०० शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारूनही अजूनही भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याचेही श्री. कोंडे यांनी निदर्शनास आणून दिले. थकबाकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वर्ग न झाल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

या वेळी रमेश पाटील, दीपक पाटील, योगेश पाटील, सुनील कोंडे, शेख मेहमूद, सचिन पाटील, शेतकरी धीरज भंगाळे, गोपाळ भिरुड, रामभाऊ सोनवणे, रामदास भंगाळे आदी उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांना विमा परतावा मिळालेला नाही, त्यासंबंधी आढावा, माहिती संकलित केली असून, विमा परतावा केवळ तांत्रिक अडचणीमुळे देण्यास अडचण आली आहे. त्यात काही कागदपत्रांची पूर्तता करून द्यायची असून, त्यासाठी रावेर तालुक्यातील भारतीय कृषक विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना सर्व सहकार्य विमा कंपनी करीत आहे.
कुंदन बारी, समन्वयक, भारतीय कृषक विमा कंपनी (एआयसी), जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com