Crop Damage : मराठवाड्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा एकदा मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा एकदा मराठवाड्यात परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला. जवळपास पाच जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी झाल्याने अनेक भागांतील पीक (Crop Damage) पाण्याखाली गेली. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या तालुक्यातील सर्व पाचही मंडलांत ६६ ते १४२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage : बारामती तालुक्यात पिकांचे ३७४५ हेक्टरवर नुकसान

ऐन काढणीच्या हंगामात परतीचा पाऊस मराठवाड्यातील सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात बरसत शेती पिकाचे मोठे नुकसान करतो आहे. गुरुवारी (ता .२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात मात्र पावसाने ३३ मंडलांत अति जोरदार बरसात पीक होत्याची नव्हती करून टाकली. बीड जिल्ह्यातील १२ लातूरमधील आठ, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणीमधील प्रत्येकी दोन व हिंगोलीतील पाच मंडळाचा अतिवृष्टी झालेल्या मंडळात समावेश आहे.

Crop Damage
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : विनयकुमार आवटे

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५९ मंडलांत तुरळक हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४२ मंडळात पावसाची हजेरी तुरळक, हलकी ते मध्यम स्वरूपाची राहिली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ मंडलांत पावसाची तुरळक हलकी मध्यम ते दमदार ते जोरदार हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५० मंडलांत पाऊस झाला या जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उसंत घेतली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४१ मंडलांत पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना पूर आला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले, शेतातील पिके आणि माती वाहून गेली, जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी नळविहिरा, भातोडी, जाफराबाद, वरखेडा विरो, आळंद, सावरगाव मस्के, बोरखेडी चिंच, हिवरा काबली हिवराबळी, हरपाळा निमखेडा देऊळगाव उगले यास तालुक्यातील गावात जोरदार पाऊस पडल्याने नुकसान झाले. भातोडी येथील नाल्याच्या पुरात विठ्ठल उगले नावाचा तरुण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी शहर व तालुक्यात गुरुवारी रात्री ११ च्या ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडला. सरासरी ८९ मिलिमीटर पाऊस झाला. तर गाढे पिंपळगाव येथील नदीच्या पुराच्या पाण्यात एक युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. तहसील प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून, युवकाची शोध मोहीम सुरू आहे. तालुक्यातील संगम येथील शेतकऱ्याच्या घरात नदीचे पाणी घुसल्याने तब्बल दीडशे पोते सोयाबीन भिजले आहे. पिकाची गेल्याने रब्बीची सोय लावावी तरी कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मिलिमीटरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा

हरसूल ८५.७५

लासूरगाव ८५.७५

जालना जिल्हा

सिपोरा १०१

टेंभुर्णी ८६.२५

बीड जिल्हा

चौसाळा ६६.२५

तालखेड ६६.५०

अंबाजोगाई ७७.२५

लोखंडी सावरगाव ६८.५०

घाटनांदूर ९८

बर्दापूर ७०

नांदूरघाट ६५.७५

परळी ८३.५०

धर्मापुरी ६६

नागापूर ८३.५०

सीरसाळा ६९.७५

पिंपळगाव १४२

लातूर जिल्हा

रेणापूर ६८.७५

शेलगाव ६८.५०

पोहरेगाव ६९.५०

पळशी ९३.५०

हेर ७६.२५

हरंगुळ ८५

बाबळगाव ९२.२५

लातूर ८५

उस्मानाबाद जिल्हा

कळंब ६५.५०

जेवळी ६७.२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com