Grape Advisory
Grape Advisory  Agrowon
ॲग्रो गाईड

Grape : फिलेज : द्राक्ष बागेतील घड जिरण्याची विकृती

टीम ॲग्रोवन

डॉ. स. द. रामटेके, अप्पासो गवळी, अमृता लंगोटे, स्नेहल खलाटे

या वर्षी सर्वच विभागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस (Rainfall) झाला. त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये बऱ्याचदा पानांच्या संरक्षणासाठी (Grape Leaves Protection) फवारण्या घेण्यात अडचणी आल्या. तसेच सततच्या पावसाळी हवामानामुळे (Rainy Weather) नवीन फुटी येणे चालूच राहिले. या सर्व गोष्टींमुळे बऱ्याच ठिकाणी घडनिर्मितीमध्ये समस्या येत असून, अनेक ठिकाणी घड जिरण्याची समस्याही उद्‍भवण्याची शक्यता आहे.

द्राक्ष बागेमध्ये घड जिरण्याची विकृती कशी व कधी येते?

एप्रिल छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभाव राहिल्यास ऑक्टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. फळ छाटणीनंतर ७ ते १० दिवसांच्या कालावधीमध्ये ‘पोंगा अवस्था’ येते. या पोंगा अवस्थेत ही विकृती येते.

घड जिरणे म्हणजे काय?

हायड्रोजन सायनामाइड लावल्यानंतर फुटी ८ ते १२ दिवसांत दिसू लागतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला एक आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटी सोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात. यालाच ‘घड जिरणे’ असे म्हणतात.

घड जिरण्याची कारणे?

घड जिरणे ही एक विकृती आहे. द्राक्ष बागेची खरड छाटणी उशिरा झाल्यामुळे अन्ननिर्मिती व अन्नसाठा घेण्यासाठी लागणारा सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतो. तसेच खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान राहिल्यास सूक्ष्म घडनिर्मिती प्रक्रिया चालू असते. अशा वेळी पेशी विभाजनाची प्रक्रिया होत नाही.

याचा परिणाम घड निर्मितीवर होतो. तसेच खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ होते. वेलीमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. द्राक्ष बागेमध्ये छाटणीच्या वेळी वेलीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पांढरी मुळी कार्यक्षम नसल्यामुळे वेलीमध्ये अन्नसाठा कमी होतो. अशा कारणांमुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होते.

घड जिरण्याची लक्षणे :

फळछाटणी होऊन प्रीब्लूम अवस्था असलेल्या बागेत घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. ५ व्या पानावर घडनिर्मिती होते व बाळी फुटून गॅपमध्ये घडनिर्मिती झाली असेल तर असे घड जिरतात.

घड जिरण्याच्या समस्येवरील उपाययोजना :

१) खरड छाटणी उशिरा न करता योग्य वेळीच घ्यावी. त्या पुढील कालावधीमध्ये काडीला योग्य सूर्यप्रकाश मिळू शकेल. त्यामुळे घड जिरण्याची समस्या काही प्रमाणात कमी करता येईल. शक्यतो बागांची खरड छाटणी मार्चमध्ये केल्यास घड जिरण्याची समस्या येत नाही.

२) खरड छाटणी योग्य वेळी घेतल्यास घडाचे पोषण होते. जास्तीत जास्त घडनिर्मिती होते. त्याच बरोबर फळछाटणी घेण्यापूवी द्राक्ष काडीची तपासणी करावी. यामुळे कोणत्या डोळ्यावर घडनिर्मिती चांगली झाली आहे. याचे निदान करता येते.

३) काडी तपासणी अहवालानंतर घड व घडांची संख्या लक्षात घेऊन छाटणी करावी. व तज्ज्ञांच्या साह्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांचे, रोग व किडींचे योग्य व्यवस्थापन करावे.

४) वेलीतील अन्नसाठा संतुलित राहण्यासाठी वेळोवेळी टॉपिंग व पिंचिंग करावी.

५) जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. बोदामध्ये

पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार होण्यास मदत होते.

६) घड जिरण्याची समस्या वेळोवेळी होत असेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नेमके कारण जाणून उपाययोजना करावी.

डॉ. स. द. रामटेके, आप्पासो गवळी, अमृता लंगोटे, स्नेहल खलाटे

प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT