Grape production : द्राक्ष उत्पादन वाढीसाठी माती, देठ, पाणी परीक्षण महत्त्वाचे

द्राक्षाचे उत्पादन क्षमता वाढण्यासाठी द्राक्ष शेतीतील माती, देठ, पाणी परीक्षण अवश्य करून घ्यावे, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी व्यक्त केले.
Grape Production
Grape ProductionAgrowon

सांगली : द्राक्ष बागायतदार (Grape Producers) शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन द्राक्ष पिकाचे (Grape Crop) नियोजन गरजेचे असते. त्याचप्रमाणे द्राक्षाचे उत्पादन क्षमता वाढण्यासाठी द्राक्ष शेतीतील माती, देठ, पाणी परीक्षण अवश्य करून घ्यावे, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर (Dr. R. G. Somkuwar) यांनी व्यक्त केले.

Grape Production
Grape Crop Insurance: द्राक्ष विमा योजनेचा लाभ कसा घ्याल ?

डफळापूर (ता. जत) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जत व एलंटा ॲग्रो प्रा, लि. आणि ऐश्‍वर्या कृषी सेवा केंद्र, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष पीक चर्चासत्रात बोलत होते. ‘आत्मा’च्या क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम झाला.

Grape Production
Grape Production : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ बना

या वेळी आमदार विक्रमसिंह सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडीदार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान अधिकारी रविकिरण पवार, एलंटा ॲग्रोचे संचालक संजीव कोल्हार, ऐश्‍वर्या कृषी सेवा केंद्राचे संचालक अर्जुन सवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Grape Production
Grape Advisory : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

डॉ. सोमकुंवर म्हणाले, की द्राक्षाची खरड छाटणी ही द्राक्ष वेलीच्या काड्यांवरील डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे खरड छाटणी काळजीपूर्वक केली पाहिजे. शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यादृष्टीने बागेचे व्यवस्थापन काटेकोर पद्धतीने करायला हवे. द्राक्ष छाटणीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत सांगितले.

दरम्यान, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते भौगोलिक मानांकन नोंदणी कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी विक्रमसिंह सावंत यांनी द्राक्ष शेती समोरील आव्हाने, पाऊस, हवामान बदल विचारात घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाच्या मदतीने शेती तंत्रज्ञान वापरून प्रगती करावी, असे आवाहन केले.

मनोजकुमार वेताळ म्हणाले, की उत्तम द्राक्ष शेती हे सूक्ष्म व्यवस्थापनाचा भाग आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष निर्मितीकडे लक्ष द्यावे. देशभरासह परदेशात द्राक्ष शेतीस मोठी संधी आहे. द्राक्ष पिकाचे आणखी मूल्यवर्धन करून त्याशी निगडित नवी उत्पादने आणतील का याचा विचार व्हावा. त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com