Egg Diet Agrowon
ॲग्रो गाईड

Egg Diet : रोज अंडी खा, निरोगी राहा

मानवी शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. अंड्यातील प्रथिने आणि इतर पोषक घटकांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते. सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे.

टीम ॲग्रोवन

मानवी शरीराच्या योग्य वाढीसाठी समतोल आहार (Balanced Diet) अत्यंत महत्त्वाचा आहे. समतोल आहारामधून प्रथिने, खनिजे, ऊर्जा आणि जीवनसत्त्वांचा (Minerals And Vitamin) आवश्यक पुरवठा शरीराला होतो. शरीराला अत्यंत आवश्यक असलेली, मात्र शरीरात तयार न होणारी अमिनो आम्ले अंड्यामध्ये (Amino Acids in Egg) आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने उच्च (High Protein) दर्जाची असतात. अंड्याचा दैनंदिन आहारात समावेश वाढविणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने आहारात अंड्याचा समावेश केल्यास ग्रामीण भागातील कुक्कुटपालनास चालना मिळून त्यांचे अर्थार्जन वाढेल. सध्याच्या स्थितीत दूध व मांस या पदार्थांत भेसळीचे प्रकार घडत आहेत. परंतु अंड्यावर असलेल्या कवचामुळे त्यात कोणतेही भेसळ करता येत नाही. तसेच विविध जीवजंतूंपासून अंड्याला नैसर्गिक संरक्षण मिळण्यास मदत होते.

पोषक घटकांनी परिपूर्ण ः

- अंड्यामधून सरासरी ६६ किलो कॅलरी ऊर्जा मिळते, ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या ३ टक्के असते.

- अंड्याच्या प्रथिनांची गुणवत्ता ९३.७ टक्के आहे. त्यामुळे अंड्याला संतुलित प्रथिनांनी युक्त असे म्हणतात. अंड्याच्या प्रथिनांचा पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर दुसरा क्रमांक लागतो. ही प्रथिने मांसपेशीच्या वाढीसाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी उपयुक्त असतात.

- एका अंड्यामध्ये उत्तम दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असते. त्यात शरीराला आवश्यक असलेली ९ अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले लहान मुलांच्या हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

- शरीराची झीज होताना येणारा ताण-तणाव कमी करण्यासाठी तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ/ गाठ निर्माण होणे/कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंड्यात असते. नियमित अंड्याचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

- अंड्यातील लोह शरीरातील लाल पेशी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.

- अंड्याच्या सेवनाने काही प्रमाणात कॅल्शिअमची कमतरता भरून येते.

- केसांची वाढ व नखांसाठी आवश्यक असलेले घटक अंड्यात आहेत.

गर्भवतींसाठी उपयुक्त ः

- गर्भवती महिलांसाठी अंड्यातील प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे पोटातील गर्भाची वाढ नियमित आणि नैसर्गिकरीत्या होते. तसेच बाळाच्या अंगी रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते.

- अंड्याच्या बलकातील कोलीन गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ठरते. मेंदूपेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीड्स हे कोलीनमुळे मिळते.

- मुडदूस, अल्झायमर, हाडाची ठिसूळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम कोलीनमुळे कमी होते.

- दैनंदिन आहारात आवश्यक असलेल्या एकूण कोलीनपैकी २० टक्के कोलीन अंड्यात असते.

- जन्मदोष कमी करण्यासाठी अंड्यातील फोलेट हा घटक उपयोगी आहे.

- अंड्याचा बलक हा जीवनसत्त्वे, क्षार, लोह यांचा प्रमुख स्रोत असतो. लहान मुलांसाठी हा पहिला आदर्श घनआहार आहे.

- गरोदर महिला आणि स्तन्यपान करणाऱ्या मातांनी दैनंदिन आहारात अंड्यांचा समावेश केला पाहिजे. कारण अंड्यातील लोहाद्वारे त्यांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य होईल.

ऊर्जेचा स्रोत ः

- अंड्यात आवश्यक अमिनो आम्लाचे प्रमाण चांगले असते. त्यातील ल्युसीन हे मांसपेशीतील ग्लुकोज वापरण्यासाठी मदत करते. जर ल्युसीनची कमतरता असेल तर ग्लुकोज जास्त प्रमाणात वापरले जात नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. रोज अंडे खाल्ल्याने ही कमतरता भरून निघते. मांसपेशीतील ग्लुकोजचा वापरही उत्तम रीतीने होतो. त्यामुळे खेळाडूंसाठी, शरीर कसरतीचे काम करणारे व्यक्ती आदींच्या आहारात अंडी अत्यंत उपयोगी ठरतात.

- अंडी खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते. दिवसभर भूक लागली असे वाटत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत नाही. स्थूलता वाढली तर मधुमेहाचा धोका वाढतो. अंड्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

- रक्तात होणाऱ्या गाठी आणि हृदयविकार यांची जोखीम कमी करणारे घटक अंड्यात आहेत. अंड्यातील पेप्टाइड हे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

- आहारात अंड्याच्या समावेशामुळे मानवी रक्तातील घातक कोलेस्टेरॉल एलडीएलचे प्रमाण कमी होऊन आवश्यक कोलेस्टेरॉल एचडीएलचे प्रमाण वाढते.

- अंड्यातील कोलीन हा घटक शरीरात निर्माण होणारा दाह कमी करून हृदयरोगाची जोखीम कमी करण्यास मदत करतो.

- निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड अंड्यात चांगल्या प्रमाणात असते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ः

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ‘जीवनसत्त्व अ’ अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दृष्टी उत्तम राहण्यास मदत होते.

अंडे हे शिळे आहे की ताजे कसे ओळखावे?

अंडी खाण्यापूर्वी ती ताजी आहेत की नाहीत, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक असते. त्याकरिता पाण्याच्या पातेल्यात अंडे बुडवावे. पाण्‍यात बुडविल्यानंतर अंडे एका बाजूवर आडवे झाले तर ते पूर्णतः ताजे आहे असे समजावे. उभे राहिले तर कमी ताजे आहे असे समजावे. मात्र जर अंडे पाण्यावर तरंगू लागले तर ते नक्कीच शिळे आहे हे समजावे. अशी अंडी खाणे टाळावे.

घ्यावयाची काळजी ः

- बऱ्याचदा विकत आणलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर केला जातो. मात्र फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाण्यापूर्वी त्यावर गरम पाणी ओतावे.

- अंडी मंद आचेवर शिजवावीत. अन्यथा, कडक होऊन त्यांचा स्वाद कमी होतो.

- बी. डी. बामणे, ९८६०६ ८९३७३

(पशुसंवर्धन व दुग्ध विज्ञान, कृषी महाविद्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT