Citrus Crop Management : लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन

शेतातील जमीन संपृक्त झाल्यामुळे लिंबूवर्गीय फळे विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
Management of brown decay, stalk rot on citrus fruits
Management of brown decay, stalk rot on citrus fruitsAgrowon
Published on
Updated on

सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमान अशी वातावरण स्थिती आहे. त्यातच शेतातील जमीन संपृक्त झाल्यामुळे लिंबूवर्गीय फळे (Citrus Fruit) विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा (Phytopthera Fungus) प्रादुर्भाव वाढू शकतो. या प्रादुर्भावामुळे पाने काळी पडणे, पानगळ होणे व फळांवर तपकिरी डाग (Brown spot) पडण्याची विकृती होण्याची दाट शक्यता आहे.

Management of brown decay, stalk rot on citrus fruits
लिंबूवर्गीय बागा वाचविण्यासाठी सिट्रस ग्रिनिंग रोगाचे व्यवस्थापन

फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे -
१) पानावरील चट्टे लक्षणे :
पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकिरी काळी होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात झाड जणू खराटे सारखे दिसते. परिणामी, अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलमा तसेच नुकेतच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून पडतात.

Management of brown decay, stalk rot on citrus fruits
अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळपिकातील उपाययोजना

२) फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कुज लक्षणे :
पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरवी असलेली फळे यावर तपकिरी, करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या सालीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेस तपकिरी कुज (ब्राऊन रॉट) असे म्हणतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. तोडीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळली गेल्यास निरोगी फळेही सडतात.

Management of brown decay, stalk rot on citrus fruits
लिंबूवर्गीय फळपिकावरील कीड व्यवस्थापन

फळमाशी
सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यामध्ये फळमाशीमुळे फळगळ होताना दिसते. या किडीची मादी माशी आणि तिच्या अळीमुळे फळांचे नुकसान होते. प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक किंवा अनेक अंडी घालते. तीन ते पाच दिवसांत अंडी उबल्यानंतर त्यातून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळामध्ये शिरून, रस व गरावर गुजराण करतात. त्यामुळे फळांचा नाश होतो, त्याची गुणवत्ता घटते. अंडी घालतेवेळी पडलेल्या छिद्राच्या भागामध्ये अन्य रोगजंतू किंवा बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पिवळे डाग पडतात. अकाली फळगळ होते. असे फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून रसाचे पिचकारीसारखे फवारे उडतात.

व्यवस्थापन :
१) सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच पडून राहिल्यास रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. प्रसार जलद गतीने होते. बागेतील वाफे स्वच्छ ठेवावेत.
२) बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. जिथे पावसाचे पाणी साठून राहते, त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
३) प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल.* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी झाडाच्या परिघात, खाली पडलेल्या पाने व फळांवरही करावी. त्यामुळे त्यावरील बुरशीचा नायनाट होईल. तसेच जमिनीवरील सक्रिय बीजाणूही नष्ट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी यात अन्य कोणतेही बुरशीनाशक/कीटकनाशक/विद्राव्य खते मिसळू नये.
४) रासायनिक घटकांच्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या नंतर ट्रायकोडर्मा हार्जियानम* १०० ग्रॅम अधिक सुडोमनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम या प्रमाणे १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावे.

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे :
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होते. तो भाग काळा पडतो. हा काळा भाग नंतर वाढत जातो. संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यांवरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या प्रादुर्भावामुळे रोगग्रस्त फळे आकुंचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

व्यवस्थापन:
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे होणाऱ्या फळगळीसाठी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

Management of brown decay, stalk rot on citrus fruits
बुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजना

व्यवस्थापन :
-फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.
-बागेतील खाली पडलेली फळे वेचून नष्ट करून बाग स्वछ ठेवावी.
-फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत असते. झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी.

(नोंद : * ॲग्रेस्को शिफारस; लेबल क्लेम नाही.)
-----------------------
डॉ. योगेश इंगळे, ३४२२७६६४३७
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प- फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Management of brown decay, stalk rot on citrus fruits
फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळा उपयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com