Mango Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : आंबा, नारळ, काजू, सुपारी पिकाची काळजी कशी घ्याल?

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी पिकामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार पुढील उपाययोजना कराव्यात.

Team Agrowon

मागील काही दिवसापासून झालेला जोरदार पाऊस आणि त्यामुळे वाढलेली आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाश यामुळे बुरशीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात आंबा, काजू, नारळ आणि सुपारी पिकामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार पुढील उपाययोजना कराव्यात.

आंबा
- हापूस आंब्यामध्ये वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म दहा वर्षानंतर प्रकर्षाने दिसून येतो. यासाठी पूर्ण वाढलेल्या दहा वर्षावरील हापूस आंब्याला दरवर्षी नियमित फळे येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा दिली जाते.
- झाडाच्या विस्ताराचा पूर्व - पश्चिम व दक्षिण - उत्तर व्यास मोजून घ्यावा. त्याची सरासरी काढून विस्ताराच्या प्रति मीटर व्यासास तीन मिली या प्रमाणात पॅक्लोब्युट्राझोलची मात्रा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.
- झाडाच्या बुंध्याभोवती विस्ताराच्या निम्म्या अंतरावर १० ते १२ सेंमी खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे घ्यावेत. पॅक्लोब्युट्राझोलची आवश्यक मात्रा ३ ते ५ लिटर पाण्यात मिसळून घेतलेल्या खड्ड्यामध्ये द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे. पावसाची तीव्रता कमी असताना पॅक्लोब्युट्राझोलची आळवणी करावी.
- पॅक्लोब्युट्राझोल देण्यापूर्वी झाडाभोवती असलेले तण काढून टाकावे. तणनाशक वापरायचे असल्यास ग्लायफोसेट तणनाशक ५ मिली अधिक १० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी करावी. पावसाची किमान चार ते सहा तास उघडीप राहील तेव्हा फवारणी गवताच्या पानांवर पडेल अशा प्रकारे करावी.
- लक्षात ठेवा ग्लायफोसेट हे तणनाशक आनिवडक गटातील असल्याने झाडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तणनाशक फवारणी केलेल्या बागेमध्ये जनावर चरण्यास सोडू नये.

काजू


वाढलेली आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाशामुळे काजूची पानगळ आणि फांद्यांची मर होऊ शकते. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (०.२ टक्के) बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.

नारळ
- आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे आणि बागेत पाणी साठून राहिल्यामुळे नवीन तसेच जुन्या लागवडीमध्ये कोंबकुजव्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपांचे निरीक्षण करून लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पण मुलूल दिसते. असे पान बाहेरून दुमडून पाहिल्यास नरम पडलेले दिसते. कालांतराने असे पान हलक्या हाताने ओढून पाहिल्यास सहज उपसून येते आणि पानाच्या देठाचा वास येतो.
- कुजलेले कोंब स्वच्छ करून त्यामध्ये एक टक्का बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ०.२५ टक्के कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा १ टक्का बोर्डो मिश्रणाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी झाडाच्या कोंबानजीकच्या गाभ्यावर पावसाची उघडीप असताना करावी.
- बोर्डो मिश्रण पावसामध्ये पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून, चिकटणारा पदार्थ स्टिकर मिश्रणात मिसळून फवारणी करावी.

सुपारी
- सुपारीवर कोळेरोग हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. यापुर्वीचा प्रादुर्भाव फळांच्या देठावर होत असल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
- कोळेरोग ह्या बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडाची रोगट शिंपुटे आणि वाळलेल्या झावळ्या नष्ट कराव्यात. झाडावरील बेचक्यात एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा फॉसिटॉल (ए. एल. ०.३ टक्के) ३ ग्रॅम प्रतिदिन दहा लिटर पाणी या प्रमाणात आळवणी पावसाची उघडीप पाहून करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT