Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : जगाचे कापूस उत्पादन २५ दशलक्ष टनांखाली राहणार

Cotton Update : जगभरात कापूस उत्पादन २०२४-२५ च्या हंगामात २५ दशलक्ष टनांखाली किंवा सुमारे १२०० लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) एवढे राहू शकते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जगभरात कापूस उत्पादन २०२४-२५ च्या हंगामात २५ दशलक्ष टनांखाली किंवा सुमारे १२०० लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) एवढे राहू शकते. उत्पादन मागील हंगामापेक्षा फारसे वाढणार नाही. यातच अमेरिकेतील टेक्सास भागात चांगला पाऊस झाला असून, तेथे लागवडीतही वाढ झाल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील लागवड पूर्ण झाली असून, तेथे लागवडीत सुमारे एक लाख हेक्टरने वाढ झाली आहे. अमेरिकेतील टेक्सास भागात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. मागील वेळेस तेथे दुष्काळ व प्रतिकूल स्थितीमुळे अडचणी तयार झाल्या व कापूस उत्पादनाला तेथे फटका बसला होता. देशात उत्तर भारतातील लागवडही सुमारे तीन लाख हेक्टरने कमी झाली आहे. भारतातील एकूण लागवड स्थिर म्हणजेच १२६ ते १२७ लाख हेक्टरपर्यंत राहू शकते. चीनमधील लागवडही पूर्ण झाली असून, तेथील स्थितीकडे जगातील वस्त्रोद्योगाचे लक्ष आहे.

२०२३-२४ मध्ये जगात २५ दशलक्ष टन म्हणजेच सुमारे १२०० लाख कापूस गाठींचे (एक लाख १७० किलो रुई) उत्पादन येईल, असा अंदाज आहे. यात अमेरिकेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढू शकते. २०२३-२४ मध्ये तेथे १९० लाख गाठी उत्पादनही हाती आलेले नाही. भारतात ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज सुरुवातीला होता, पण गुलाबी बोंड अळी व कमी पावसामुळे देशात उत्पादन ३०० लाख गाठीदेखील हाती आलेले नाही.

चीनमध्येही नैसर्गिक समस्यांमुळे मागील वेळेला उत्पादनाला फटका बसला, तेथे सुमारे ३५१ लाख गाठी उत्पादन हाती आले आहे. जगाचे उत्पादन सरत्या हंगामात सुमारे ११०० लाख गाठींपर्यंतच आल्याची माहिती आहे. चीन, भारत व अमेरिका हे प्रमुख कापूस उत्पादक देश गेले दोन वर्षे प्रतिकूल स्थितीमुळे हवे तेवढे किंवा उद्दिष्टाएवढे कापूस उत्पादन साध्य करू शकत नसल्याने जगभरात कापूस उत्पादन कमी येत आहे.

उत्तर भारतात क्षेत्र घटले

भारतात उत्तर भारत, गुजरात वगळता इतर क्षेत्रातील कापूस पीक पावसाचे पाणी किंवा निसर्गावर अवलंबून आहे. उत्तर भारतात कापूस लागवड कमी झाली आहे, तेथे सुमारे १३ लाख हेक्टरर्पंयत यंदा लागवड झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ लाख हेक्टरवर लागवड होवू शकते, पण यातील फक्त चार ते पाच टक्के क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा आहे. यामुळे मोसमी पावसावर पिकाचे सर्व अंदाज अवलंबून आहेत.

अमेरिकेतील लागवड किंचित वाढली

अमेरिकेत सुमारे ४१ लाख हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. परंतु तेथील लागवड सुमारे ४२ लाख हेक्टरवर झाली आहे. ब्राझीलमध्ये १६ लाख, पाकिस्तानात २३ लाख, चीनमध्ये ३३ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. पाकिस्तानातही पंजाब व लगतच्या भागातील कापूस पिकाला सिंचनाची सुविधा आहे. इतर भागात कोरडवाहू लागवड केली जाते. जगात कापूस पिकासाठी आणखी दोन महिने महत्त्वाचे आहेत, या काळात नैसर्गिक फटका बसल्यास मोठी घट उत्पादनात येईल, अशी माहिती आहे. परंतु अमेरिकेतील उत्पादन यंदाही वाढू शकते, असा अंदाज आहे.

जगात अमेरिका, चीन व पाकिस्तानच्या काही भागात कापूस लागवड पूर्ण झाली आहे. भारतातही उत्तर भारतातील पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड आटोपली आहे. जगात कापसाखालील क्षेत्र वाढेल, अशी स्थिती नाही. अमेरिकेत चांगला पाऊस झाल्याने लागवडीत वाढ झाली आहे. तेथे उत्पादनही वाढणार असल्याची माहिती आहे.
महेश शारदा, कापूस विषयाचे जाणकार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT