Cotton Production : अतिसघन पद्धतीने वाढले कापूस उत्पादन

Cotton Cultivation : अलीकडील काळात अनेक शेतकऱ्यांनी सघन बीटी कापूस लागवड तंत्राचा वापर सुरू केला आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon

Cotton Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : कापूस

शेतकरी : स्वप्नील शेळकी

गाव : चिस्तुर, ता. आष्टी, जि. वर्धा

एकूण क्षेत्र : आठ एकर

लागवड पद्धत व व्यवस्थापनातील बदल हे उत्पादकता वाढीसाठी कारण ठरू शकते. अलीकडील काळात अनेक शेतकऱ्यांनी सघन बीटी कापूस लागवड तंत्राचा वापर सुरू केला आहे. संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी देखील त्यासंबंधी प्रकल्प राबवले आहेत. चिस्तुर हे जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. बहुतांश ग्रामस्थांचा शेती आणि शेतमजुरी हाच व्यवसाय आहे.

सोयाबीन आणि कपाशी ही गावची दोन मुख्य पिके आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोअररवेलचा पर्याय सिंचनासाठी असून ठिबक सिंचनाचा वापर शेतकऱ्यांनी अवलंबिला आहे. गावातील स्वप्नील शेळके हे प्रयोगशील युवा शेतकरी आहेत. त्यांनीही मागील दोन वर्षांपासून अति सघन पद्धतीने कापूस लागवडीवर भर दिला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वप्नीलने काही वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. पुढे घरची शेती सांभाळण्यासाठी नोकरीचा राजीमाना दिला. स्वप्नील यांच्याकडे पूर्वी चार बाय दीड फूट अंतरावर कापूस लागवड व्हायची. या पद्धतीत एकरी सातहजारांच्या दरम्यान झाडे बसायची.

Cotton Farming
Cotton Seed : अकोल्यात कपाशीच्या बियाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

कोरडवाहू पद्धतीत एकरी चार क्विंटलपर्यंत तर थोडी साधारण जमीन आणि सिंचनाची सोय असल्यास सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळायचे. केंद्रीय कापूस सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ कापूस तज्ञ गोविंद वैराळे यांनी स्वप्नील यांना अति सघन बीटी कापूस लागवडीविषयी माहिती दिली.

मग स्वप्नील यांनी त्यानुसार सुधारणा करण्यास सुरुवात केली. या पद्धतीत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने राबवलेल्या प्रयोगानुसार ९० बाय १५ सेंमी. असे लागवड अंतर ठेवले जाते. अर्थात, त्यामध्ये जमिनीचा प्रकारही महत्त्वाचा असतो. झाडांची एकरी संख्या २५ हजार ते २९ हजारांपर्यंत राहते. या पद्धतीत ‘कॅनॉपी मॅनेजमेंट’ हा घटक महत्त्वाचा ठरतो. स्वप्नील यांनी त्यानुसार व्यवस्थापन केले.

झाडांची उंची अनावश्‍यक अधिक वाढल्यास अन्नद्रव्ये निरर्थक फांद्यांच्या पोषणात खर्ची होतात. हे लक्षात घेऊन लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी वाढ नियंत्रकांचा वापर करून झाडांची उंची नियंत्रणात ठेवली. सुमारे ६० ते ७५ दिवसांनी शेंडा खुडणी केली. परिणामी, अन्नद्रव्ये बोंडांना मिळाली.

Cotton Farming
Cotton Seed: दिवसभर रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळेना

स्वप्नील सांगतात, की प्रति झाडाला दहा ते कमाल वीस ते पंचवीस बोंडे राहू शकतात. दहा बोंडे अपेक्षित धरल्यास प्रति बोंडापासून चार ग्रॅम तर दहा बोंडांपासून ४० ग्रॅम कापूस मिळतो. एकरी २५ हजार झाडे गृहीत धरल्यास सरासरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. माझ्याकडे प्रति झाडा १८ ते २० बोंडे होती.

त्यामुळे उत्पादकता १८ क्विंटलपर्यंत मिळू शकली. सघन लागवड तंत्रज्ञानामध्ये पाण्याचे व्यवस्थापन हा सर्वात मोठा घटक आहे. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी संपूर्ण हंगामात चार फवारण्या घेतल्या.

मागील तीन वर्षांमध्ये स्वप्नील यांना बीटी कपाशी वाणाचे एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. मागील वर्षी लागवड पद्धतीत व व्यवस्थापनात सुधारणा केल्याने एकरी उत्पादनवाढ मिळाली आहे. त्यास प्रति क्विंटल ७३०० रुपये दर मिळाला.

महाराष्ट्राचा पर्जन्यमान सरासरी ९३४ मिमी आहे. याउलट कापूस पिकाला फक्त ६०० ते ७०० मिमी पाणी लागते. साधारणपणे दरमहा किमान ७५ ते १०० मिमी पावसाचे वितरणही जमिनीत ओलावा देते. तसेच कापूस पिकाला पोषक तत्त्वे शोषून घेण्यास मदत करते. लागवडीनंतर ४५ दिवसांत ७०० मिमी पैकी १५ टक्के पाऊस पडणे आवश्यक आहे, त्यानंतर फुलोऱ्यापासून बोंडाच्या विकासापर्यंत पुढील १२० दिवसांत ८५ टक्के पाऊस पडणे आवश्यक आहे.
डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

स्वप्नील शेळकी ९१५८९७६७४२

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com