Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

Cotton Market : जगात कापूस उत्पादनात अनेक वर्षे क्रमांक एक राहिलेल्या भारताची कापूस उत्पादकता गुलाबी बोंड अळी व अन्य समस्यांमुळे कमी होत आहे. कापूस उत्पादनात भारत आता जगात दुसरा आहे. यातच देशात कापूस उत्पादन वर्षागणिक कमी होत आहे.
Cotton
CottonAgrowon

Jalgoan News : जगात कापूस उत्पादनात अनेक वर्षे क्रमांक एक राहिलेल्या भारताची कापूस उत्पादकता गुलाबी बोंड अळी व अन्य समस्यांमुळे कमी होत आहे. कापूस उत्पादनात भारत आता जगात दुसरा आहे. यातच देशात कापूस उत्पादन वर्षागणिक कमी होत आहे.

२०११ ते २०१४ या कालावधीत भारताने ४०० लाख कापूसगाठींपर्यंतचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन साध्य केले. पण कापूस पिकात २०१४-१५ नंतर गुलाबी बोंड अळीची समस्या आली. पुढे ही समस्या थांबली नाही. दुसरीकडे कापूस बियाण्याचे रोगराई व गुलाबी बोंड अळी, अमेरिकन लष्करी अळी आदींना प्रतिकारक्षम वाण,

तंत्रज्ञान न आल्याने कापूस उत्पादनातील भारताची घसरगुंडी कायम राहिली आहे. जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश भारत आहे. परंतु कापूस उत्पादनात भारत चीनच्या मागे पडला आहे. चीनमध्ये फक्त ३३ ते ३४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते.

पण तेथे ३५३ ते ३५४ लाख कापूसगाठी एवढे उत्पादन साध्य केले जात आहे. भारतात मात्र कापसाची लागवड मागील पाच वर्षे सरासरी १२५ लाख हेक्टरवर झाली आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून चीनपेक्षा भारताचे उत्पादन कमीच राहिले आहे.

Cotton
Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

कापूस निर्यातीतही भारत मागील तीन वर्षे सतत मागे राहिला आहे. कापसाची लागवड भारतात अधिक होते, पण क्रमांक एकचा निर्यातदार अमेरिका आहे. अमेरिकेतील कापूस लागवड ४२ ते ४३ लाख हेक्टरवर असते. त्यांचे उत्पादनही मागील तीन वर्षे कमी झाले आहे. तेथे मागील हंगामात सुमारे २२८ लाख गाठी एवढे झाले.

या हंगामात सुमारे २१० लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. परंतु निर्यातीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. अमेरिकेने मागील तीन वर्षे सरासरी १९५ लाख कापूस गाठींची निर्यात साध्य केली आहे. तर भारतातून मागील दोन हंगामात मिळून कापूस निर्यात ५० लाख गाठी एवढीदेखील झालेली नाही.

भारतात कापसाची गरज ३०० ते ३०५ लाख गाठी एवढी आहे. देशातील वस्त्रोद्योग चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन कोटींवर कामगार व अन्य मंडळी या उद्योगात कार्यरत आहे. परंतु कापूस उत्पादन कमीच होत राहिल्यास भारतावर पुढे कापूस आयात करण्याची वेळ येईल.

Cotton
Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

उत्पादकतेला फटका

भारतात कापूस पिकावर सर्वत्र गुलाबी बोंड अळीची समस्या तयार झाली आहे. तसेच कमी व अतिपाऊस, किडी व अन्य समस्यांच्या गर्तेत कापूस पीक अडकले आहे. यामुळे भारताची कापूस उत्पादकता ४५० किलो रुई प्रतिहेक्टरी अशी झाली आहे. त्यात महाराष्ट्राची कापूस उत्पादकता फक्त ३४८ किलो रुई प्रतिहेक्टरी एवढीच आहे. त्यात राज्यात सर्वाधिक म्हणजेच साडेपाच लाख हेक्टरवर कापूस लागवड करणाऱ्या जळगाव जिल्ह्याची कापूस उत्पादकता फक्त ३२९ किलो रुई प्रतिहेक्टरी अशी आहे.

देशातील कापूस उत्पादनाची स्थिती (लाख गाठींमध्ये)

वर्ष उत्पादन

२०२१-२२ ३५२

२०२२-२३ ३१२

२०२३-२४ २९५ ते ३०० (अपेक्षित)

भारत कापूस उत्पादनासह निर्यातीत चांगली कामगिरी करणारा देश म्हणून जगात ओळखला जात होता. परंतु कापूस पिकात रोगराई, गुलाबी बोंड अळीची समस्या सतत येत आहे. पाऊसमान कमी-अधिक आहे. दुसरीकडे देशात कापसाखालील क्षेत्र उत्तर भारत वगळता अन्यत्र कमालीचे कोरडवाहू आहे. यामुळे कापूस उत्पादन कमी होत असून, कापूस पुरवठा प्रक्रिया उद्योगास हवा तसा नाही.
दीपक पाटील, संचालक, वस्त्रोद्योग महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com