Dharashiv News: पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकल्प व तलावांच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी बंद होऊन प्रकल्पांतील पाणीपातळी स्थिर झाली आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पातील विसर्ग अद्याप सुरू असून सध्या पाच हजार शंभर क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. .मांजरा धरणाची पाणीपातळी स्थिर करण्यासाठी सोमवारी (ता. २०) एक हजार ७४७ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील एकूण २२६ प्रकल्पांपैकी १९४ प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व प्रकल्पांत मिळून उपयुक्त पाणीसाठा ९३.७ टक्के आहे..Marathwada Dam Water Status : मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात उरला १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा.मॉन्सून माघारी परतला आहे. मागील १२ दिवसांपासून जिल्ह्यात अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. सध्या ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. तापमानात चांगलीच वाढ झाली असून कमाल तापमानाचा पारा ३२.४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. दिवसा ऊन आणि रात्रीच्या थंडीत वाढ झालेली आहे. पाऊस थांबल्याने ओढे, नद्यांमधून प्रकल्पांत सुरू असलेली पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. .जिल्ह्यातील एकूण २२६ असलेल्या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता ८६३.८८७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी प्रकल्पांत सध्या एकूण ८१३.१५४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील दहा दिवसांत हा पाणीसाठा ०००.८३२ दलघमीने घटला आहे. नऊ ऑक्टोबर रोजी प्रकल्पांत ८१३.९८६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. सर्व प्रकल्पांत मिळून उपयुक्त पाणीसाठा ७२८.८०४ दलघमी असून सध्या प्रकल्पात ६७८.२६९ पाणीसाठा उपलब्ध आहे..Agricultural Status: पशुसंवर्धन व्यवसायाला प्राप्तिकरातून सूट मिळणार?.दरम्यान भरलेल्या प्रकल्पांची संख्या २०४ वरून १९४ वर आली आहे. म्हणजेच त्यात दहा प्रकल्पांची घट झाली आहे. याशिवाय १३ प्रकल्पांमध्ये ७५ ते ९९ टक्के उपयुक्त, ११ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्केदरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. २५ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेले सध्या सहा प्रकल्प आहेत. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेला एक प्रकल्प आहे. तर जोत्याखाली एक प्रकल्प आहे. .जिल्ह्यात सर्वांत मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पातील विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे, नऊ ऑक्टोबर रोजी १४ हजार ५०० क्युसेकने हा विसर्ग सुरू होता. तो रविवारी (ता. १९) ५ हजार १०० क्युसेकने सुरू होता. सौना नदीत हा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या प्रकल्पात १०० टक्के म्हणजे १५० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे..Agricultural Status: पशुसंवर्धन व्यवसायाला प्राप्तिकरातून सूट मिळणार?.प्रकल्प एकूण क्षमता (दलघमी) प्रत्यक्ष पाणीसाठा(दलघमी) उपयुक्त साठ्याची टक्केवारीसीना कोळेगाव १५०.४९१ १५०.४९१ १००मध्यम प्रकल्प (१७) २२८.४५७ २२१.५०७ ९६.६२ लघु प्रकल्प (२०८) ४८२.९१७ ४४१.१५६ ८९.९६एकूण २२६ ८३३.६८७ ८१३.९८६ ९३.१७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.